Buildings Demolished Videos | काही सेंकदात गगनचुंबी इमारत जमीनदोस्त, या व्हिडिओतील दृश्य हादरवतील

Buildings Demolished Videos | नोए़़डातील सेक्टर 93 मधील 103 मीटर उंचीची ट्विन टॉवर ही इमारत स्फोटके लावून जमीनदोस्त करण्यासाठी अवघा अर्धा तास उरला आहे. स्फोटके लावून उडवण्यात येणारी ही सर्वात उंच इमारत आहे.

Buildings Demolished Videos | काही सेंकदात गगनचुंबी इमारत जमीनदोस्त, या व्हिडिओतील दृश्य हादरवतील
इमारत कोसळायला अवघा अर्धा तासImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 2:09 PM

Buildings Demolished Videos | नोए़़डातील (Noida) सेक्टर 93 मधील 103 मीटर उंचीची ट्विन टॉवर (Twin Tower) ही इमारत स्फोटके लावून जमीनदोस्त करण्यासाठी अवघा अर्धा तास उरला आहे. स्फोटके लावून उडवण्यात येणारी ही सर्वात उंच इमारत आहे. त्यासाठी या इमारतीमध्ये तब्बल 3700 किलो विस्फोटके (Explosive) लावण्यात आली आहेत. प्रत्येक मजल्यावर आणि तळात स्फोटकांचा साठा आहे. एक बटन दाबताच ही इमारत झरझर पत्त्याच्या इमारतीप्रमाणे कोसळेल. 15 सेंकदात ही इमारत जमीनदोस्त होईल. जगात यापूर्वीही अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारत उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीत प्रशासनाच्या देखरेखीखाली उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. अवैध बांधकामांवर (Illegal Construction) कारवाईसाठी असे प्रयोग यापूर्वी अनेक देशात करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना धडा बसणार आहे.

आता जमीनचुंबी

नोएडा येथील सेक्टर 93 मधील ट्विन टॉवर या दोन गगनचुंबी इमारती आहेत. त्यातील एक 32 मजल्यांची आहे. तिची उंची जवळपास 103 मीटर आहे. तर दुसरे टॉवर हे 30 मजली आहे. त्याची उंची 97 मीटर आहे. ही दोन्ही टॉवरची उंची कुतुब मिनारपेक्षाही जास्त आहे. दोन्ही टॉवरमधील अंतर हे केवळ 9.88 मीटर आहे. नियमानुसार, दोन उंच इमारतींमधील अंतर हे 16 मीटर इतके आवश्यक आहे. परंतू ट्विन टॉवरच्या बांधकाम व्यावसायिकांनी सर्व नियम धाब्यावर बसवले. या दोन्ही टॉवरच्या इमारतीत एकूण 9 हजार 640 छिद्र करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण 3800 किलोग्रॅम स्फोटके लावण्यात आली आहेत. काही सेकंदात ही इमारत जमीनचुंबी होईल.

ट्विन टॉवर व्यतिरिक्त जगभरात अनेक ठिकाणी उंच इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मीना प्लाझा, एएफई टॉवरसह इतर अनेक इमारतींचा समावेश आहे. त्यांचे व्हिडिओ हादरवणारे आहेत. हे व्हिडिओ पाहुयात..

हे सुद्धा वाचा

अबुधाबी येथील मीना प्लाझा ही इमारत 2022 ही इमारत स्फोटकांनी उडवून देण्यात आली होती. या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याने ही कारवाई करण्यात आली होती. जर्मनीत एपी टॉवर AfE Tower 2014 साली उद्धवस्त करण्यात आले. त्याची उंची 116 मीटर होती. ही इमारत 38 मजली होती. 2 फेब्रुवारी 2014 रोजी पाडण्यात आली.

मोठ्या मोठ्या इमारती पाडण्यासाठी प्रत्येक मजल्यावर स्फोटके लावण्यात येणार आहे. टॉवरला मजबुती देण्यासाठी पिलरचा वापर करण्यात येतो.

या पिलरला स्फोटके लावण्यात येतात. त्यानंतर काही सेकंदातच इमरात उद्धवस्त होते. गगनचुंबी इमारत काही सेकंदात जमीनदोस्त होते. ट्विट टॉवर ही इमारत काही सेकंदात उद्धवस्त होणार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.