भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत

भारतासह जगभरातील अनेक औषध कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार केली आहे. या लसीचा आपत्कालीन वापर करता यावा, यासाठी अनेक औषध कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल केला आहे.

भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 11:30 PM

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून कोरोना या आजाराने संपूर्ण जगाला वेठिस धरले आहे. आता या आजारावरील लस येऊ घातली आहे. भारतासह जगभरातील अनेक औषध कंपन्यांनी कोरोनावरील लस (Coronavirus Vaccine) तयार केली आहे. या लसीचा आपत्कालीन वापर करता यावा, यासाठी अनेक औषध कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लवकरच देशात लसीकरण मोहीम राबवली जाण्याची शक्यता वाढली आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Minister of Health Harsh Vardhan) यांनी कोरोनावरील लसीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Health Minister Harsh Vardhan said that people of the country could get Covid-19 Vaccine in January 2021)

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, जानेवारी (2021) महिन्यात देशात लोकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते. लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेला (प्रभावशीलता) आम्ही प्राधान्य देणार आहोत. याबाबत आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात आपण भारतीय नागरिकांना पहिली कोरोना लस देण्याच्या स्थितीत येऊ शकतो.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. जेणेकरुन या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल. गेल्या आठवड्यात असे सांगण्यात आले होते की, DGCI ने या कंपन्यांकडून लसीबाबतचा अधिक डेटा मागितला आहे, ते खरे असले तरी त्याचा लस मिळण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही.

भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांसह देशात इतर काही औषध कंपन्यांच्या लसींची चाचणी सुरु आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस कोविशिल्डची (Covishield) चाचणी करत आहे. या लसीच्या चाचणीचा सध्या तिसरा टप्पा सुरु आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि आयसीएमआर निर्मित कोवॅक्सिन (Covaxin) लस तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या घेत आहे.

भारत सरकारचा मेगा प्लॅन

भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण्यासाठी आखून दिलेल्या समितीने आधी लस कुणाला द्यायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सूचवण्यात आलं आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यास सूचवण्यात आलं आहे. लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.

हेही वाचा :

दोस्त पुन्हा मदतीला आला, पुढच्या वर्षी 30 कोटी लस देणार?

ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

इस्रायलमध्ये 27 डिसेंबरपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात, दिवसाला 60 हजार नागरिकांचे लसीकरण

(Health Minister Harsh Vardhan said that people of the country could get Covid-19 Vaccine in January 2021)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.