‘लग्नाआधी मुलगा-मुलीची रक्त-कुंडली जुळायला हवी’, केद्रीय आरोग्यमंत्री असं का म्हणाले?

हिंदू धर्मात लग्न करताना मुलगा आणि मुलीची कुंडली बघितली जाते (Health Minister Harsh Vardhan on thalassemia).

'लग्नाआधी मुलगा-मुलीची रक्त-कुंडली जुळायला हवी', केद्रीय आरोग्यमंत्री असं का म्हणाले?
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 2:52 PM

नवी दिल्ली : हिंदू धर्मात लग्न करताना मुलगा आणि मुलीची कुंडली बघितली जाते. त्यांचे 36 पैकी किती गुण जुळतात याचा अभ्यास केला जातो. मात्र, या कुंडलीसोबतच मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली देखील तपासली जावी, त्यांच्या रक्ताचीदेखील चाचणी केली जावी, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत मांडलं. लोकसभेत खासदार मनोज कोटक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी ही बाब सांगितली. विशेष म्हणजे लग्नापूर्वी मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली तपासली जावी, यासाठी मोहिम राबवावी लागेल, असंदेखील ते यावेळी म्हणाले (Health Minister Harsh Vardhan on thalassemia).

लग्नाआधी रक्त-कुंडली बघून युवक आणि युवतीला योग्य आरोग्य सल्ला दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे त्यातून संबंधित जोडप्याचं होणारं बाळ थॅलेसीमिया वाहक होऊ नये. त्यामुळे लग्नाआधी रक्त-कुंडली बघणं हे समाजासाठी आणि आजार संपवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसीमिया आजार साजरा केला जातो.

देशात दरवर्षी 10 हजार बालक थॅलेसीमिया बाधित जन्माला येतात

देशात दरवर्षी दहा हजार थॅलेसीमिया बाधित बालकं जन्माला येतात. त्यामुळे लग्नाआधी थॅलेसीमिया टेस्ट व्हावी, असं तज्ज्ञ म्हणतात. थॅलेसीमियाबाबत लोकांमध्ये जागरुकता होणं जरुरीचं आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता नसल्याने रुग्णावर पुरेसा उपचार होत नाही. देशात दरवर्षी हजारो थॅलेसीमिया बाधितांचा मृत्यू होतो. त्यामुळे लग्माआधी थॅलेसीमिया चाचणी करावी, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

थॅलेसीमिया हा नेमका आजार काय?

थॅलेसीमिया हा रक्ताचा आजार आहे. या आजारामुळे शरीरातील ब्लड सेल्स कमजोर होतात. काही लोकांमध्ये जीन्स वेरिअंट्स नसल्याने या आजाराची लागण होते. या आजारात हिमोग्लोबिन प्रोटीन बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिनच्या माध्यमातूनच रेड ब्लड सेल्सला ऑक्सिजन पोहोचतो.

आई किंवा वडील या दोघांपैकी कुणीही एकाला जरी हा आजार असला तर हा आजार मुलाला देखील होण्याची शक्यता असते. थॅलेसीमिया बाधित बालकांना एका विशिष्ट ठरलेल्या वेळेत शरीरात नवं रक्त चढवावं लागतं. त्यामुळेच जर आई-वडिलांपैकी कुणीही या आजाराने बाधित असेल तर मुलाचा विचार करु नये, असा सल्ला डॉक्टर देतात (Health Minister Harsh Vardhan on thalassemia).

हेही वाचा : हिरेनप्रकरणही एनआयएकडे, सरकारची नामुष्की की वाझेंच्या अडचणीत वाढ?; वाचा, सविस्तर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.