भारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर

"भारतात जलद गतीने कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. आतापर्यंत एकूण 25 लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे", अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे (Health Ministry of India on Corona Situation in India).

भारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:30 PM

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संकटाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. याशिवाय बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. दुसरीकडे सरकारची कोरोना लसीकरण मोहिम, या सर्व कारणांमुळे भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचं दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत कोरोना लसीच्या लसीकरण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. “भारतात जलद गतीने कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. आतापर्यंत एकूण 25 लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे (Health Ministry of India on Corona Situation in India).

“आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी दोन वाजता 25 लाख पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस टोचली गेली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. देशात सध्या 1 लाख 75 हजार कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. भारतात सर्वात वेगाने 10 लाख लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले आहेत.

कोरोनाची लस टोचल्यानंतर आतापर्यंत 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे प्रमाण एकूण लोकांच्या 0.0007 टक्के इतकं आहे. आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लस टोचल्याने झालेला नाही. याशिवाय कोरोना लसीचा कोणताही गंभीर परिणाम आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने याआधी दिली आहे (Health Ministry of India on Corona Situation in India).

भारताने कोरोना संसर्गाला रोखलं : हर्षवर्धन

दरम्यान, भारताला कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्यापैकी यश आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आज मंत्र्यांसोबतच्या 23 बैठकीत म्हणाले. “देशातील 146 जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय 18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. सहा जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपासून तर 21 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही”, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

हेही वाचा : कुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.