जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

भारताच्या कोरोना लसी या सर्वात स्वस्त आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली (Health Ministry of India on corona vaccine).

जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन
corona vaccine
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 10:53 PM

नवी दिल्ली : भारतात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून लसीकरणासाठी सर्व तयारी पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (12 जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना लसीबाबत माहिती दिली. भारताच्या कोरोना लसी या सर्वात स्वस्त आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली (Health Ministry of India on corona vaccine).

फायझर लसीच्या दोन डोजची किंमत 1431 रुपये इतकी आहे. मार्डना लसीची किंमत 2348 ते 2700 रुपये, शिनोफार्मची किंमत 5650, शिनोवॅक बायोटेकची किंमत 1027, नोवॅक्सची किंमत 1114, जॉन्सन अँड जॉन्सनची किंमत 734 रुपये तर स्पुटनिक लसीची किंमत 734 इतकी आहे. भारतात तयार झालेली कोविशील्ड लसीची किंमत 200 तर कोवॅक्सिन लसीची किंमत 295 रुपये इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली (Health Ministry of India on corona vaccine).

केंद्र सरकारने किती डोज खरीदल्या?

केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूटकडून दहा लाख डोज खरेदी केल्या आहेत. यापैकी 547200 डोज लसी केंद्र सरकारला मिळाल्या आहेत. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना या लसी पुरवल्या जातील. 14 जानेवारीपर्यंत पहिल्या सत्रातील लसी राज्यांना मिळणार आहेत. दुसरीकडे भारत बायोटेककडून केंद्र सरकारने 55 लाख लसींचे डोज विकत घेतले आहेत. विशेष म्हणजे भारत बायोटेकने 16.5 लाख डोज केंद्र सरकारला मोफत दिले आहेत.

सध्या पर्याय नाही

भारतात सध्या ज्या लसी आहेत त्याच उपलब्ध आहेत. इतर लसींच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे ज्या लसी आहेत त्यांना पर्याय नाही. इतर लसी अंतिम टप्प्यात यशस्वी झाल्या तर पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असं राजेश भूषण यांनी सांगितलं आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

लस टोचल्यानंतर 14 दिवसांनी परिणाम

कोरोना लस टोचल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकार क्षमता बनेल याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे. लसीच्या दुसऱ्या डोजनंतर चौदा दिवसांनी शरीरात चांगल्या प्रकारची रोगप्रतिकार क्षमता बनू शकेल. पहिला डोज दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोज दिला जाईल. त्यानंतर 14 दिवसांनी चांगली रोगप्रतिकार क्षमता बनेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर लस घेतल्यानंतरही दक्षता पाळण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.