लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

"आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत", असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं (Health Ministry statement on Corona vaccine)

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 8:26 PM

नवी दिल्ली : “लस तयार करण्यासाठी साधारणपणे आठ ते दहा वर्ष लागतात. जास्त प्रयत्न केले तर लस तयार व्हायला कमीतकमी चार वर्ष लागतात. मात्र कोरोना संकटाची भीषणता लक्षात घेऊन लस जास्तीत जास्त लवकर कशी तयार होईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं आहे. ते मंगळवारी (1 डिसेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते (Health Ministry statement on Corona vaccine).

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या लसीची वाट बघत आहे. एखाद्या आजारावर लस तयार करण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 वर्ष लागतात. मात्र कोरोनाचा हाहा:कार पाहता जगभरातील अनेक देश लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतातही कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरु आहे. कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया जवळपास शेवटच्या टप्प्यावर आल्याचं बोललं जात आहे. कोरोना संकटाची भीषणता बघता भारतात 16 ते 18 महिन्यात लस विकसित करण्याचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवारा आहे. “पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावे”, असं आवाहन राजेश भूषण यांनी केलं आहे (Health Ministry statement on Corona vaccine).

भारतात आतापर्यंत 14 कोटी पेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी 6.69 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 11 नोव्हेंबरला हे प्रमाण 7.15 टक्के होतं. मात्र 1 डिसेंबर रोजी हे प्रमाण 6.9 टक्के इतकं आहे. मात्र, तरीही जगभरातील इतर देशांच्या तुलनेने भारतातील परिस्थिती बरी असल्याची प्रतिक्रिया राजेश भूषण यांनी दिली.

हेही वाचा :

सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचे आश्वासन दिलेच नव्हते: केंद्रीय आरोग्यमंत्रालय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.