भारतामधील कोरोनाची विध्वसंक परिस्थिती पाहून सत्या नाडेला, सुंदर पिचाई हळहळले; मायक्रोसॉफ्ट-गुगल मदतीसाठी पुढे सरसावले
भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. | Coronavirus in India
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर (Coronavirus in India) आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जगातील दोन बलाढ्या कंपन्याही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करु तशी माहिती दिली. (Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus)
भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असे सत्या नाडेल यांनी सांगितले.
318 Oxygen Concentrators loaded by Air India at JFK Airport in the US, on their way to Delhi.#COVID19 pic.twitter.com/PB0CRjk5qf
— ANI (@ANI) April 26, 2021
तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरवाल जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.
गेल्या 24 तासांत देशात 3,52,991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3,52,991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2812 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशातील 2,19,272 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.
#WATCH | An Air India flight, carrying 500 BiPAPs, 250 oxygen concentrators & other medical supplies from Singapore, landed in Mumbai last night.#COVID19 pic.twitter.com/9S5G8ASE9S
— ANI (@ANI) April 26, 2021
‘मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय’
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला (Modi govt) लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर (Parkala Prabhakar) यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले.
संबंधित बातम्या :
Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर
मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक
यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले
(Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus)