नोव्हेंबरमध्ये उष्णतेने तोडले सर्व रेकॉर्ड, डिसेंबरमध्ये काय असेल परिस्थिती? IMD चा अंदाज काय

भारतीय हवामान खात्याने यंदा थंडी कशी असेल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. डिसेंबर महिना सुरु झाला असून थंडीची लाट येईल असं लोकांना वाटत आहे. नोव्हेंबरमध्ये उष्णतेने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिना कसा असेल याबाबत आयएमडीने अंदाज वर्तवला आहे.

नोव्हेंबरमध्ये उष्णतेने तोडले सर्व रेकॉर्ड, डिसेंबरमध्ये काय असेल परिस्थिती? IMD चा अंदाज काय
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 4:54 PM

IMD Prediction : भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये दिवस उष्णता आणि रात्री थंडी पडताना दिसत आहे. पण अजूनही डिसेंबर महिन्यात हवी तशी थंडीची स्थिती पाहायला मिळत नाहीये. संध्याकाळनंतर आणि सकाळच्या आधी थंडी अजूनही मर्यादित आहे. पण दिवसा कडक सूर्यप्रकाश पडतोय. 2024 चा नोव्हेंबर महिना हा 1901 नंतर देशातील दुसरा सर्वात उष्ण नोव्हेंबर महिना ठरलाय. नोव्हेंबरमध्ये सरासरी कमाल तापमान 29.37 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागच्या हंगाता 28.75 अंश तापमानाची नोंद झाली होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये हवामानाचे स्वरूप बदलेल अशी शक्यता आहे. थंडी आता सुरु होणार आहे. पण मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या लाट जास्त दिवस नसेल.

नोव्हेंबर २०२४ मध्ये देशातील अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा खूपच जास्त राहिले. लोकांना उष्णेतेचा सामना करावा लागला. पण आता थंडीची प्रतीक्षा अजून लांबली आहे. हवामान तज्ज्ञ यांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून उष्णता जाणवत आहे. डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडते. पण यंदा परिस्थिती काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

डिसेंबरमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण यंदा कमी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

IMD चा अंदाज काय

भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी माहिती दिली की, यावेळी थंडीची लाट कमी असेल. IMD च्या अंदाजानुसार, या वेळी थंडीच्या लाटेच्या दिवसांची संख्या नेहमीच्या पाच ते सहा दिवसांपेक्षा कमी असेल. IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, या मोसमात, दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील बहुतांश भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जेथे कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.