Yellow alert | भारतातील एक प्रमुख महानगराला पावसाचा फटका

Yellow alert | हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केलाय. भारतातील एक प्रमुख महानगराला पावसाचा फटका बसलाय. पुढचे दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Yellow alert |  भारतातील एक प्रमुख महानगराला पावसाचा फटका
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 11:08 AM

बंगळुरु : भारतातून आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बंगळुरुला सोमवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं. शहरातील काही भागात पाणी साचलं होतं. वाहनांनी त्याच जलमय रस्त्यावरुन मार्ग काढला. पावसामुळे कामावरुन घरी परतताना नोकरदारांना त्रास सहन करावा लागला. रविवार संध्याकाळपासून बंगळुरु शहरात पावसाच्या सरी कोसळतायत. भारतीय हवामान खात्याने मंगळवारसाठी बंगळुरुला यलो अलर्ट जारी केलाय. पुढचे दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचल्याची तसेच झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या अनेक तक्रारी बंगळुरु महानगरपालिकेला प्राप्त झाल्या. हेन्नूर भागात झाडं कोसळल्याच्या तसेच वसंत नगर आणि अन्य भागात पाणी साचलं होतं. हवामान खात्यानुसार, सोमवारी रात्री 8.30 पर्यंत बंगळुरु शहरात 4 cm पाऊस झाला. HAL एअरपोर्ट् परिसरात 5 cm पाऊस कोसळला.

बंगळुरु शहरातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचलं होतं. जलमय रस्त्यावरुन मार्ग काढताना वाहनांना अनेक अडथळे आले. काही भागात ट्रॅफीक जॅम झालं होतं. पुढचे तीन दिवस बंगळुरुमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल, असं आयएमडीचे प्रमुख प्रसाद यांनी म्हटलय. त्यांनी यलो अलर्ट जारी केलाय. “दिवसाच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस कोसळेल. संध्याकाळी 6 च्या सुमारास हा पाऊस होईल” असा अंदाज प्रसाद यांनी वर्तवलाय. कधीपर्यंत पाऊस सुरु राहील?

शहरातील काही भागात 7 ते 8 cm पाऊस होईल असा अंदाज प्रसाद यांनी व्यक्त केलाय. “रायलसीमा ते कन्याकुमारी तामिळनाडू तसेच बंगळुरुसह दक्षिण कर्नाटकात रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. 12 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस असाच सुरु राहील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल” असं प्रसाद यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.