तब्बल ६० वर्षांनी ‘या’ राज्याला मिळाली पहिली महिला आमदार

नागालँडमध्ये आमदारकीपर्यंत महिला पोहोचू शकली नाही. मात्र आजवर इथे 2 महिला खासदार बनल्या आहेत. आता प्रथमच एक महिला आमदार पोहचली आहे.

तब्बल ६० वर्षांनी 'या' राज्याला मिळाली पहिली महिला आमदार
हेखनी जाखलू
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 4:10 PM

आगरतळा : देशात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. देशातील महिलांना देश स्वातंत्र्य झाल्यापासून मतदानाचा अधिकारही दिला आहे. परंतु देशातील एका राज्याची निर्मिती होऊन ६० वर्षे झाली तरी एकही महिला आमदार आतापर्यंत नव्हती. आता २०२३ मध्ये पहिली महिला आमदार निवडून आलीय. त्यामुळे ६० वर्षानंतर विधानसभेत एखाद्या महिलेचा प्रवेश होणार आहे. नागालँडमध्ये प्रथमच महिला आमदार विजयी झाली आहे. महिला आमदार बनण्याचा मान फक्त सात महिन्यांपूर्वी राजकारणात आलेल्या हेकानी जोखालू यांना मिळाला आहे.

हेखनी जाखलू ठरल्या पहिल्या महिला आमदार

हे सुद्धा वाचा

नागालँडमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. त्यानंतरही एकही महिला आमदार झाली नाही. यावेळी चार महिला मोठ्या हिंमतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. नागालँडमधील 183 उमेदवारांपैकी चार महिला निवडणुकीच्या मैदानात होत्या. त्यात दिमापूर-तृतीय विधानसभा मतदार संघातून एनडीपीपी (Nationalist Democratic Progressive Party )ने हेखनी जाखलू यांना तिकिट दिले होते. त्यांनी लोक जनशक्ती पार्टीच्या एजेटो झिमोमी यांचा 1536 मतांनी पराभव केला. 47 वर्षीय हेकानी यांना 14,395 मते मिळाली. त्या फक्त 7 महिन्यांपूर्वी राजकारणात आल्या होत्या. हेखनी जाखलू यांनी पदवीत्तर शिक्षण घेतले आहे.

या महिला होत्या रिंगणात

तेनिंग येथून काँग्रेसच्या रोजी थॉम्पसन उभ्या होत्या. पश्चिम अंगामी येथून एनडीपीपीच्या सालहुटुआनो क्रूस आणि अटोइजू येथून भाजपच्या काहुली सेमा मैदानात आहेत. सालहुटुआनो क्रूस या विजयाच्या मार्गावर आहेत. काँग्रेसच्या रोजी थॉमसन यांनी शंभर मतेही मिळाली नाही. परंतु इतर दोन जणी अजून निवडून आल्या तर नागालँडच्या इतिहासात प्रथमच तीन आमदार होणार आहेत.

आमदार नाही पण खासदार आहेत

नागालँडमध्ये आमदारकीपर्यंत महिला पोहोचू शकली नाही. मात्र आजवर इथे 2 महिला खासदार बनल्या आहेत. 1977 मध्ये रानो मेसे शाजिया यांनी यूनायडेट डेमोक्रेटिक पार्टीकडून लोकसभा जिंकली होती. नागालँडच्या त्या पहिल्या महिला खासदार होत्या. त्यांच्यानंतर मागील वर्षी भाजपने नागालँडमधून राज्यसभेवर एस फांगनोन कोन्याक यांना नियुक्ती दिली.

60 सदस्य संख्या असलेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजप आणि NDPP युतीचं सरकार येणार आहे. त्यांनी ३६ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने 20 तर NDPP ने 40 जागांवर निवडणूक लढवली होती. काँग्रेसला अजून खातेही उघडता आले नाही.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.