महाराष्ट्रानंतर या राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता? आमदार बंडखोरी करुन सरकार पाडणार

महाराष्ट्राच्या राजकारणात जसा भूकंप झाला तसाच भूकंप आणखी एका राज्यात होण्याची शक्यता आहे. चंपाई सोरेन यांनी आपले राजकीय हेतू स्पष्ट केले आहेत. ते नवीन मार्गाच्या शोधात आहे. अंतिम निर्णय होणे बाकी आहे. दुसरीकडे हेमंत सोरेन यांच्या सरकारबाबतही अनेक गोष्टी समोर येत आहेत. अशा स्थितीत हे समजून घेणे आवश्यक आहे की चंपाई सोरेने यांच्या बंडामुळे हेमंत सोरेन यांना नुकसान होईल की नाही?

महाराष्ट्रानंतर या राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता? आमदार बंडखोरी करुन सरकार पाडणार
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 7:46 PM

महाराष्ट्राने दोन वेळा मोठी बंडखोरी पाहिली. पहिल्यांना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि दुसऱ्यांदा अजित पवार यांनी ही बंडखोरी करत राज्यात राजकीय भूंकप घडवून आणला. इतकंच नाही तर दोघांना मुळ पक्ष मिळाला त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला. देशात पहिल्यांदाच असं काही घडलं. ज्यामुळे संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेल्याने ठाकरे सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि नंतर अजित पवार हे देखील ४० आमदार घेऊन महायुतीत आले आणि उपमुख्यमंत्री झाले. हेच चित्र आता झारखंडमध्ये पाहायला मिळत आहे. कारण येथे देखील एका नेत्याने पक्षातून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. कोण आहेत चंपाई सोरेन जाणून घ्या.

चंपाई भाजपच्या संपर्कात?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. पण दुसरीकडे ते एकला चलो रे ची भूमिका घेऊ शतकतील अशीही चर्चा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे जुन्या फळीतील ते नेते आहेत. त्यांच्यासोबत काही आमदार जाऊ शकतात. त्यामुळे असं झालं तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार कोसळू शकतं. सध्याच्या परिस्थितीनुसार चंपाई सोरेन यांनी आपल्यासोबत कोणी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रविवारी सकाळी झमुमोचे अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याची बातमी वेगाने पसरली होती.

घाटसिलाचे आमदार रामदास सोरेन, बहरघोराचे समीर मोहंती, खरसावनचे दशरथ गगराई, पोटकाचे संजीव सरदार ते हेमंतचे कॅबिनेट मंत्री दीपक बिरुवा अशी नावे पुढे आली. पण एकामागोमाग एक या सर्वांनी ती शक्यता नाकारली. सर्व प्रमुख नेत्यांनी जाहीरपणे आपली भूमिकाही मांडली.

हेमंत सोरेने सरकार पडणार का?

आता सत्ताधारी झामुमोचे आमदार पक्ष बदलणार नसल्याची माहिती आहे. आमदार हे पक्ष सोडून जाणार नसल्याचे ही स्पष्ट झाले आहे. चंपाई सोरेने यांनी आपली बाजू बदलली तरी देखील सरकारला धोका नसल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे काही नेते अजूनही दावा करत आहेत की सहा आमदार हे पक्ष बदलू शकतात. पण कोणाचीही नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

चंपाई सोरेन यांना काय मिळणार?

पक्ष बदलल्यानंतर चंपाई सोरेन यांना काय मिळणार याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने जर त्यांना सोबत घेतले तर याचा राजकीय परिणाम होऊ शकतो. आता असा दावा केला जात आहे की, त्यांच्यासह पुत्रालाही पसंतीची विधानसभेची जागा मिळणार आहे. चंपाई सोरेन या निमित्ताने आपला राजकीय वारसा पुढे नेण्याचा मार्ग मोकळा करणार आहेत. असे आश्वासन भाजपने दिले आहे. याबाबत अनेक बैठका देखील झाल्या आहेत. मध्यस्थीसाठी बंगालमधील भाजपच्या एका प्रमुख नेत्याची नियुक्ती करण्यात आल्याची देखील माहिती आहे.

चंपाई सोरेन यांच्याबाबत भाजप नेत्यांमध्ये ही संभ्रम आहे. कारण त्यांना पक्षात घेतलं तर मग जमशेदपूर आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय असलेल्या नेत्यांची सर्वात मोठी समस्या आहे. चंपाई यांच्या बाजू बदलल्याने या जागांच्या समीकरणावर परिणाम होणार आहे.

चंपाई सोरेन सध्या सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपला चंपाई सोरेन यांच्या मुलालाही जागा द्यावी लागेल, ज्यामुळे ती जागा मिळण्याची आशा असलेल्या नेत्यांना धक्का बसेल. अशा स्थितीत अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे हेराफेरीही होऊ शकते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.