बॉर्डरवर जास्त दादागिरी दाखवली, तर काही क्षणात Heron कडून चीन-पाकिस्तानी सैन्याचा होईल ‘गेम’, VIDEO

Heron drone | चीन-पाकिस्तानी सैन्याचा कधी कसा गेम होईल, हे त्यांना कळणारही नाही. आकाशातून मृत्यूच तांडव होईल. म्हणजे एकाच उड्डाणात Heron चीन आणि पाकिस्तान दोघांना लक्ष्य करु शकतं.

बॉर्डरवर जास्त दादागिरी दाखवली, तर काही क्षणात Heron कडून चीन-पाकिस्तानी सैन्याचा होईल 'गेम', VIDEO
Pakistan ArmyImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 12:04 PM

नवी दिल्ली : चीन-पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेऊन इंडियन एअर फोर्सचा सातत्याने स्वत:ला अधिक सक्षम करण्याकडे कल आहे. ड्रोन सिस्टिमवर अधिक लक्ष दिलं जातय. इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात स्ट्रायकिंगची क्षमता असलेल्या चार हेरॉन मार्क-2 ड्रोन्सचा समावेश करण्यात आला आहे. या ड्रोन्सच वैशिष्ट्य म्हणजे एकाच उड्डाणात हे ड्रोन चीन आणि पाकिस्तान दोघांना लक्ष्य करु शकतं. टेहळणी बरोबरच शत्रुला उद्धवस्त करण्याची या ड्रोन्सची क्षमता आहे. हेरॉन मार्क-2 ड्रोन्सना इंडियन ए्अर फोर्सने आपल्या उत्तर सीमेवर तैनात केलं आहे.

या दोन्ही सीमांवर भारताला चीन-पाकिस्तानकडून धोका असतो. एकाच उड्डाणात हे ड्रोन दीर्घ पल्ल्याची मोहिम करु शकतं. चीनसह पाकिस्तानची सीमा कव्हर करण्याची या ड्रोनची क्षमता आहे.

भारी वजनाचे पेलोड वाहून नेता येणार

सीमेवर तैनात केलेले ड्रोन्स आधीच्या ड्रोन्सच्या तुलनेत अपग्रे़डेड आहेत. यात अत्याधुनिक टेक्नोलॉजी आहे. वर्ष 2000 मघ्ये हेरॉनच्या पहिल्या व्हर्जनचा समावेश करण्यात आला होता. दीर्घकाळ उड्डाण करण्याच्या क्षमतेसह हेरॉन ड्रोन्समध्ये भारी वजनाचे पेलोडही वाहून नेण्यास सक्षम आहे.

किती तास उड्डाण करु शकतं?

या ड्रोन्समुळे शत्रूच्या प्रदेशात खोलवरपर्यंत नजर ठेवण्याची सैन्य क्षमता प्राप्त होणार आहे. यात लांब पल्ल्याची मिसाइल्स सुद्धा फिट करता येऊ शकतात. ड्रोनकडे सॅटलाइट कम्युनिकेशनची क्षमता आहे. हे ड्रोन 36 तास उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे.

या ड्रोनमध्ये कुठली शस्त्र फिट होऊ शकतात?

शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी या ड्रोन्समध्ये लेजर सिस्टिम सुद्धा आहे. या ड्रोनमुळे एअर फोर्सच्या अन्य फायटर विमानांना सुद्धा मदत मिळेल. ड्रोन कुठल्याही हवामानात आणि कुठल्याही भागात काम करण्यासाठी सक्षम आहे. ड्रोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र फिट करता येऊ शकतात. हेरॉनमध्ये एअर टू सरफेस मिसाइस, एअर टू सरफेस रणगाडा विरोधी मिसाइस आणि बॉम्ब फिट होऊ शकतात. भारताची अमेरिकेबरोबर काय डील झाली?

हेरॉन मार्क-2 शिवाय इंडियन एअर फोर्स अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन विकत घेणार आहे. हे ड्रोन्स सुद्धा दीर्घकाळ उड्डाण करण्यासाठी सक्षम आहेत. अलीकडेच अमेरिकेबरोबर या ड्रोन्ससाठीची डील फायनल झाली आहे. प्रीडेटर मानवरहिल ड्रोन आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.