Aurangzeb : औरंगजेबाची कबर तोडा, 1 कोटी घेऊन जा, या हिंदुत्वादी नेत्याची घोषणा
Aurangzeb : सध्या देशभरात औरंगजेबावरुन वाद सुरु आहे. एका हिंदुत्ववादी संघटनेने औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी मोठ्या इनामी रक्कमेची घोषणा केली आहे. फक्त औरंगजेबच नाही, त्याच्या वजीराची सुद्धा कबर तोडणाऱ्याला विशेष इनाम देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेश पर्यंत औरंगजेबावरुन सुरु झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाहीय. पश्चिम उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये औरंगाबाद गावाच्या बोर्डाला काळ फासण्यात आलं. त्यानंतर आता हिंदू संघटनांनी औरंगजेब आणि त्याचा वजीर अबू मोहम्मद खान यांची कबर तोडणाऱ्याला कोट्यवधी रुपये इनाम म्हणून देण्याची घोषणा केली आहे. हिंदूत्ववादी नेता सचिन सिरोही या संदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलला. ‘मेरठमध्ये हिंदूचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे’ असं सिरोही म्हणाला.
औरंगजेबाच वजीर अबू मोहम्मद खानची कबर मेरठमध्ये आहे. त्याला आबूचा मकबरा सुद्धा म्हटलं जातं. त्याशिवाय मेरठचा प्रमुख बाजार आबूलेनच नाव अबू मोहम्मद खान ठेवण्यात आलय. सचिन सिरोहीने अबूचा मकबरा म्हणजे त्याची कबर तोडणाऱ्याला 50 लाखाचा इनाम देण्याची घोषणा केली आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला एक कोटीच इनाम देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
…तर सरकारला हे पैसे मिळतील
सचिन सिरोहीने सांगितलं की, “हे पैसे समाजातून गोळा करण्यात येतील. महाराष्ट्र सरकार किंवा उत्तर प्रदेश सरकारने मजारवर बुलडोझर चालवला, तर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील” हिंदुंचा गौरवशाली इतिहास वाचवण्यासाठी आणि पुनर्स्थापित करण्यासाठी जागरुक व्हावं लागेल, असं सचिन सिरोही म्हणाला. हिंदुंच्या इतिहासाच संरक्षण करण्यासाठी त्यांनी सरकारला अपील केलय. भारतावर आक्रमण करणाऱ्यांची प्रमुख स्थानांना दिलेली नाव बदलून क्रांतीकारकांची नाव देण्याच आवाहन त्यांनी सरकारला केलय. असं केल्याने भारताचा गौरवशाली सुरक्षित होईल, असं सिरोही यांचं मत आहे.
औरंगजेबामुळे महाराष्ट्रात काय झालं?
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली. सोमवारी नागपूरमध्ये याच मुद्यांवरुन दोन गटात राडा झाला. तिथे पोलीस स्टेशनबाहेर जमलेल्या जमावाने औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केली. नागपूरमध्ये झालेस्या हिंसाचारात वाहनं पेटवण्यात आली, दगडफेक झाली. त्यात पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले.