मुस्लीम वडिलांनी मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका अशी छापली, सोशल मीडियावर व्हायरल, कारण…
viral marriage card: मुस्लीम परिवाराच्या विवाह समारंभात हिंदू परंपरेनुसार छापण्यात आलेली लग्नपत्रिका हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण आहे. दोन समाजातील बंधुभाव यामुळे अधिक दृढ झाला आहे. व्हायरल होत असलेली ही लग्नपत्रिका हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहे.
viral marriage card: लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. नव दाम्पत्यांच्या या विशेष सोहळ्यात आप्तेष्टांना आग्रहाने बोलवले जाते. त्यासाठी लग्नपत्रिका छापल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लीम परिवाराची ही लग्नपत्रिका आहे. ही लग्नपत्रिका पहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. ही लग्नपत्रिका हिंदू रितीरिवाजानुसार छापली आहे. याशिवाय हिंदू देवतांची चित्रेही त्यात आहेत. वधूच्या वडिलांनीही अशी लग्नपत्रिका छापण्याचे कारणही सांगितले आहे.
भगवान गणेश, श्रीकृष्णाचा फोटो
लग्नपत्रिकेवर भगवान गणेश आणि श्रीकृष्ण यांचा फोटो आहे. लग्नपत्रिका पहिल्यावर वधू-वर यांचे नाव मुस्लीम असल्याचे दिसून येते. परंतु संपूर्ण पत्रिका हिंदू रितीरिवाजानुसार छापली आहे. त्यात लग्नाची तारीख 8 नोव्हेंबर दिली आहे. पत्ता राजा फत्तेपूरच्या पूरे अलाद्दीन गावाचा आहे.
का छापली या पद्धतीची लग्नपत्रिका
शब्बीर उर्फ टायगर यांनी आपली मुलगी सायमाच्या लग्नासाठी ही लग्नपत्रिका बनवली आहे. या पद्धतीची लग्नपत्रिका बनवण्याचे कारण त्यांनी सांगितले. ते म्हणाले, माझी मुलगी सायमा बानू हिचा विवाह सेनपूर पोस्ट सोठी महाराज गंज रायबरेली येथे राहणारा अब्दुल सत्तार यांचा मुलगा इरफान याच्याशी होत आहे. माझ्या हिंदू बांधवांना आमंत्रित करण्यासाठी मी हिंदू रितीरिवाजानुसार लग्नपत्रिका छापली आहे. गावातील हिंदू मित्रांना आणि परिचित लोकांना या पद्धतीची लग्नपत्रिका देण्याचा निर्णय मी घेतला. आमचे नातेवाईक आणि मुस्लीम समुदायासाठी उर्दू लग्नपत्रिका छापली. ही उर्दू लग्नपत्रिका आमचे हिंदू बांधव वाचू शकले नसते. त्यामुळे हिंदू पद्धतीची लग्नपत्रिका छापली. तसेच हिंदू बंधूंसाठी जेवणाचा कार्यक्रम एक दिवस आधी ठेवला आहे.
हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
मुस्लीम परिवाराच्या विवाह समारंभात हिंदू परंपरेनुसार छापण्यात आलेली लग्नपत्रिका हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण आहे. दोन समाजातील बंधुभाव यामुळे अधिक दृढ झाला आहे. व्हायरल होत असलेली ही लग्नपत्रिका हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहे.