Hindu to muslim conversion | मुस्लिम मुलीसाठी टोपी घालून मशिदीत आला, नायब तहसीलदारच धर्म परिवर्तन!
Hindu to muslim conversion | नायब तहसीलदारच हिंदू पद्धतीने पहिल लग्न झालय. त्याला दोन मुलं आहेत. मशिदीतील त्याचा नमाज पठनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा नायब तहसीलदार फोटोत डोक्यावर टोपी घालून बसलेला दिसतोय. आता त्याच नाव मोहम्मद यूसुफ आहे. आधी त्याच नाव काय होतं?
Hindu to muslim conversion | एका नायब तहसीलदाराने धर्म परिवर्तन केल्याच प्रकरण समोर आलय. या नायाब तहसलीदराचा मशिदीतील नमाज पठनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नायाब तहसीलदाराच आधीच एक लग्न झालं होतं. पण मुस्लिम मुलीसोबत लग्न केल्यानंतर धर्म परिवर्तन केलं. त्यानंतर मशिदीत नमाज पठन सुरु केलं. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ तहसीलदार स्वत: मशिदीत आले आणि त्यांनी माहिती घेतली. हे उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील प्रकरण आहे. मौदहा कोतवाली क्षेत्रातील हे प्रकरण आहे. इथल्या मशिदीत लोकांनी मागच्या दोन दिवसांपासून एका व्यक्तीला नमाज पठनासाठी येताना पाहिलं. त्याची विचारपूस केली.
त्या व्यक्तीने आपल नाव मोहम्मद यूसुफ असल्याच सांगितलं. आपण कानपूरला राहणारे आहोत, असं त्याने सांगितलं. त्याने आपण मौदहा तहसीलचा नायाब तहसीलदार असल्याच सांगितल्यानंतर उपस्थितांना धक्का बसला. मशिदीच्या मौलवीने या वादातून स्वत:ला वाचवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ तहसीलदार घटनास्थळी पोहोचला. तिथे उपस्थित लोकांची जबानी नोंदवून घेतली.
फोटोमुळे चर्चा
मशिदीचा मौलवी मोहम्मद मुस्ताक यांच्या मा्हितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती दोन दिवसांपासून नमाज पठनासाठी येत होता. त्याने आपल नाव मोहम्मद यूसुफ सांगितलेलं. आपण कानपूरचे राहणारे असून मौदहाचे नायब तहसीलदार असल्याच सांगितलं. याची सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. त्याचवेळी नायाब तहसीलदाचा टोपी घालून नमाज पठनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नायब तहसीलदार आशीष गुप्ता आधीपासून विवाहित आहे. मुस्लिम युवतीसोबत लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन केलं. आपल नाव बदलून मोहम्मद यूसुफ ठेवलं.
नायाब तहसीलदाराच नाव काय?
बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक आशीष सिंह यांच्यानुसार, तो मोहम्मद यूसुफ नाही, तर नायाब तहसीलदार आशीष गुप्ता आहे. आशीष गुप्ताच आधीच लग्न झाल असून त्याला दोन मुलं आहेत. अलीकडेच त्याने धर्म परिवर्तन करुन एका मुस्लिम युवतीसोबत लग्न केलं. त्यानंतर काचरिया बाबाच्या मशिदीत नमाज पठनासाठी जाऊ लागला.
ऊर्दू शिकण्याचा सुद्धा प्रयत्न
मौदहाचे तहसीलदार बलराम गुप्ता यांनी सांगितलं की, मौलवी मोहम्मद मुस्ताक यांच्या तक्रारीवरुन ते तपासासाठी मशिदीत गेले होते. माहिती मिळालीय की, नायाब तहसीलदार आशीष गुप्ता येथे दोन दिवस आला. त्याने ऊर्दू शिकण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आलीय.