Goa Hit & Run : गोव्यात हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी, चालक अटक

आरोपी अक्षित अग्रवालने मद्यधुंद अवस्थेत सकाळी उसगाव परिसरात काही वाहनांना धडक दिली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी ठिकाठिकाणी नाकाबंदी केली. मात्र पोलिसांना चकवा देत कारचालक धारबांदोडा परिसरात पळून गेला होता.

Goa Hit & Run : गोव्यात हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी, चालक अटक
गोव्यात हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलिस कर्मचारी गंभीर जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 7:54 PM

गोवा : गोव्यात हिट अँड रन (Hit & Run)चे प्रकरण समोर आले आहे. फोंड्याजवळच असलेल्या खांडेपार येथे एका पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन कारचालक भरधाव वेगात पसार झाला. मात्र पुढे एका झाडावर ही भरधाव कार आदळून कारने पेट घेतला. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अक्षित अग्रवाल (Akshit Agarwal) असे या कारचालकाचे नाव आहे. आरोपी अक्षित हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. त्याने काही वाहनांनाही धडक दिली. दरम्यान कारच्या धडकेत गंभीर जखमी पोलिस कर्मचाऱ्यावर गोमॅकोमध्ये उपचार सुरु आहेत. सागर पटेकर असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Hit and run in Goa, police personnel seriously injured in a car crash)

मद्यधुंद अवस्थेत कारचालकाची अनेक वाहनांसह पोलिसाला धडक

आरोपी अक्षित अग्रवालने मद्यधुंद अवस्थेत सकाळी उसगाव परिसरात काही वाहनांना धडक दिली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी ठिकाठिकाणी नाकाबंदी केली. मात्र पोलिसांना चकवा देत कारचालक धारबांदोडा परिसरात पळून गेला होता. धारबांदोड्यावरुन परतत असताना अचानक पुन्हा पोलिसांनी आणि काही वाहनचालकांनी या कारचा पाठलाग सुरु केला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास याच आरोपीने फोंडा पोलीस स्थानकातील शिपाई सागर पटेकर यांना धडक दिली आणि पसार झाला होता. मात्र पोलिसांनी आणि काही वाहनचालकांनी कारचा पाठलाग सुरुच ठेवला होता. अखेर भरधाव वेगातील कारची एका झाडाला बसताच कारने पेट घेतला. पोलिसांनी लागलीच आरोपी चालकाला ताब्यात घेतलं. मात्र तोपर्यंत पाठलाग करणाऱ्या काही तरुणांनी आरोपीला चांगलाच चोप दिला होता. (Hit and run in Goa, police personnel seriously injured in a car crash)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.