कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा नवीन व्हायरस, जगभरात भीती, भारताच्या आरोग्य मंत्रालयाची तयारी
HMPV in India: भारताकडे यंत्रणा तयार आहे. देशातील आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. तसेच नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान चीनने देशात फ्लूचा मोठा उद्रेक झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
HMPV in India: कोरोना महामारीने जगभर 2020 मध्ये हाहाकार माजवला. ही भीती अजूनही लोकांच्या मनातून गेली नाही. त्या आठवणीने अजूनही अनेकांना हादरला बसतो. आता चीनमध्ये आणखी एका विषाणूची बातमी जगासाठी डोकेदुखी ठरली आहे. भारताने त्याबाबत खबरदारी सुरु केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हणाले की, चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ होत आहे. त्यामुळे काळजी निर्माण करण्याची परिस्थिती आहे. यामध्ये मानवी मेटापन्यूमोव्हायरसमुळे होणारे रोग देखील समाविष्ट आहेत. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने त्यानंतर एका निवेदनात मंत्रालयाने जोर दिला की चीनमध्ये सर्व काही ठीक आहे. भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
आरोग्य मंत्रालयाने घेतली बैठक
आरोग्य मंत्रालयाने चीनमधील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने म्हटले, कोणत्याही संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सहकार्य सुरु आहे. HMPV सारखे विषाणू भारतात आधीपासूनच प्रचलित आहेत आणि विद्यमान आरोग्य पायाभूत सुविधा कोणत्याही संभाव्य प्रकरणांना हाताळण्यास सक्षम आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनने दावा फेटाळला
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारताकडे यंत्रणा तयार आहे. देशातील आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. तसेच नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान चीनने देशात फ्लूचा मोठा उद्रेक झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर चीनचे म्हटले आहे की, दरवर्षी हिवाळ्याच्या काळात श्वसनाच्या समस्या उद्भवतात. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदवलेली प्रकरणे कमी गंभीर नाहीत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, उत्तर गोलार्धात हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या समस्या शिखरावर असतात. चीनमध्ये प्रवास करणे सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली.