होळीला चीनला भारताकडून झटका, 10 हजार कोटींचा फटका

india china business amount: भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीन सामान देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही.

होळीला चीनला भारताकडून झटका, 10 हजार कोटींचा फटका
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 1:32 PM

यंदा होळीचा उत्सव देशभरात जोरदार साजरा केला गेला. या उत्सवात यंदा विक्रीचे सर्व विक्रम मोडले गेले. परंतु त्याचवेळी चीनला झटकाही भारताकडून दिला गेला आहे. यंदा देशात होळीच्या सामानांची विक्री 50% वाढली आहे. परंतु चीनला 10 हजार कोटींचा फटका बसला आहे. देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करत चीनी सामानांवर बहिष्कार टाकला. व्यापारी संघटना कॅटकडून (Confederation of All India Traders) देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा होळीचा व्यवसाय 50 हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. दिल्लीत पाच हजार कोटींच्या सामानांची विक्री झाली आहे. परंतु चीन साहित्यांचा वापर कमी झाला. यामुळे चीनला 10 हजार कोटींचे नुकसान झाले.

चीनमधून येत होता माल

होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल चीनमधून आयात केला जात होता. त्याचा फायदा चीनला होत होता. परंतु देशातील जनतेकडून आता स्वदेशी सामान वापरले जात आहेत. स्वदेशीला मागणी वाढली. लोकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ पाठिंबा दिला. त्याचा फायदा देशातील व्यापाऱ्यांना झाला आहे. तसेच चीनचे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यंदा होळीनिमित्त झालेल्या या बदलामुळे चीनला चांगल्या मिरच्या झोंबल्या आहेत.

का वाढली भारतीय वस्तूंची विक्री?

भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीन सामान देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही. लोकांनी देशात निर्मिती झालेल्या वस्तूंची खरेदी केली.

हे सुद्धा वाचा

कोणत्या वस्तूंची सर्वाधिक विक्री

यंदा होळीला सर्वाधिक विक्री रंग, गुलाल, पिचकरी, फुगे, संगधित रंग, चंदन, पूजा सामग्रीची विक्री झाली. तसेच लोकांनी देशातच तयार करण्यात आलेल्या हर्बर रंगाना प्राधान्य दिले. ड्राय फ्रूटस, गिप्ट आयटम्स, कपडे, किराणा, खाण्यापिण्याचा वस्तू यांचा वापर यंदा जास्त झाला. होळीत झालेल्या या बदलाचा जोरदार फटका चीनला बसला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.