UP Elections 2022: निवडणुकीच्या रणनीतीवर उद्या अमित शाह घेणार वाराणसीत बैठक, भाजपचे सर्व 403 विधानसभा प्रभारी राहणार उपस्थित
अमित शाह निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटनेचे सरचिटणीस सुनील यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या, 12 नोव्हेंबरला आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसीत भेट देणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा विजयी होण्यासाठी निवडणुकीच्या रणनीतीवर बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या TFC मध्ये, भारतीय जनता पक्षाने सर्व 403 विधानसभा प्रभारी, 98 संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या जिल्हा प्रभारी यांना बैठकीसाठी बोलवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे निवडणूक प्रभारी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीला संबोधित करतील. (
बैठकीला कोण उपस्थित असतील
या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि प्रदेश संघटन सरचिटणीस सुनील बन्सल आणि सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारीही उपस्थित राहणार आहेत. वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमित शाह गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित परिषदेचे उद्घाटनही करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेशचंद श्रीवास्तव यांनी सांगितले की, 12 नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय हस्तकला संकुल, वाराणसी येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या सर्व 403 विधानसभा प्रभारी, 98 संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी यांची बैठक आहे.
विविध क्षेत्रांचा अहवाल तयार करणार आला आहे
ही बैठक दोन सत्रात होणार आहे. राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान पहिल्या सत्राला संबोधित करतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या सत्राला संबोधित करतील, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक व्यवस्थापन टीमकडून विविध क्षेत्रांचा अहवाल तयार करणार आला आहे. त्याआधारे अमित शहा आगामी निवडणुकीची रणनीतीवर चर्चा करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक व्यवस्थापन टीमच्या बैठकीनंतर अमित शाह निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटनेचे सरचिटणीस सुनील यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. यासोबतच अमेठी कोठीतही महत्त्वाची बैठक होणार आहे.
Other News