VIDEO: भयानक..सात तास झाडाला बांधून जबर मारहाण, दुसऱ्या तरुणाकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला केली ही शिक्षा
ही घटना बांसवाडाच्या घाटोल सर्कल येथील आहे. या परिसरातील काही व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातील एका व्हिडीओत एका तरुण आणि तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचे सप्ष्टपणे दिसते आहे. अनेक जण अमानुषपणे या दोघांना मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत आहे.
जयपूर – एका नराधम पतीने पत्नीवर कलेलेल्या अत्याचाराही ही कहाणी आहे. राजस्थानात बासवाडा (Baswada, Rajasthan)जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात एका महिलेला झाडाला बांधून (tied to tree)ठेवल्याचा हा व्हिडीओ आहे. अनेक तास तिला या बंधक अवस्थेत ठेवण्यात आले होते. इतकंच नाही तर या नराधम पतीने या पत्नीला दांडक्याने जबर मारहाणही केली. इतकी क्रूर शिक्षा करण्याचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या महिलेची चूक इतकीच होती की, तिने तिच्या एका पुरुष मित्राकडून (lift from friend)लिफ्ट घेतली होती. यामुळे नाराज झालेल्या पतीने आपल्या पत्नीला असे झाडाला बांधून मारले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात नराधम पतीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
As per viral video Rajasthan government should immediately actions .#Rajasthan @RamLalG56094491 @RajasthanGovern @RitaSinghal6 @AkashPr07041013 https://t.co/aulAxs6VqT
हे सुद्धा वाचा— Indian Media Council(IMC) (@council_indian) July 30, 2022
व्हायरल व्हिडीओवरुन झाला तपास
ही घटना बांसवाडाच्या घाटोल सर्कल येथील आहे. या परिसरातील काही व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातील एका व्हिडीओत एका तरुण आणि तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचे सप्ष्टपणे दिसते आहे. अनेक जण अमानुषपणे या दोघांना मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. रात्री सुमारे दोनच्या सुमारास पती-पत्नीला शोधून काढण्यात आले. पीडित महिलेने रात्री एफआयआर दाखल केली. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. केवळ दुसऱ्या तरुणाने लिफ्ट दिली म्हणून केलेली ही शिक्षा पाहून तेही आवाक झाले.
नेमके काय घडले होते?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची सासूरवाडी हेरो गावात आहे. ही महिला काही कामानिमित्ताने शुक्रवारी घाटोल बाजारात गेली होती. याच दरम्यान तिला मित्र देवीलाल मईडा भेटला. महिलेने देवीलालला मावस सासूच्या घरी मुडासेलला सोडण्याची विनंती केली. महिला आणि देवीलाल हे मावस सासूच्या घरी पोहचल्यानंतर तिथे वेगळेच घडले. मावस सासू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संशयाच्या आधारावर या दोघांना बंदी केले. तिच्या पतीला बोलावण्यात आले. तिने दिलेल्या तक्राीरनुसार, पती महावीर, दीर कमलेश, भावजय सुंका आणि मामे सासऱ्यांनी या दोघांना दांडक्यांनी आणि बुटांनी मारहाण केली. या महिलेला सात तास झाडाला बांधून ठेवण्यात आले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली.