बागेश्वर सरकार लोकांचे मन कसं ओळखतात, काय आहे राज?

बागेश्वर सरकारचा दावा आहे की, त्यांना दैवी देगणी मिळाली आहे. लोकांच्या समस्या त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

बागेश्वर सरकार लोकांचे मन कसं ओळखतात, काय आहे राज?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 2:40 PM

रायपूर : काही बाबा, साधू वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करतात. अनेक जण आपणास दैवी देणगी मिळाल्याचे सांगतात. सध्या बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज (Bageshwar Dham)या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री (bageshwar dham sarkar) लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यांच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार देशभर प्रसिद्ध झाले आहे. मोठ्या संख्येने लोक बागेश्वर धामच्या दरबारात जातात आणि आपल्या अडचणी व प्रश्न मांडतात.

काय आहे बागेश्वर सरकारचा यांचा दावा

बागेश्वर सरकारचा दावा आहे की, त्यांना दैवी देगणी मिळाली आहे. लोकांच्या समस्या त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

तज्ज्ञांच्या काय आहे दावा

बागेश्वर महाराजांना लोकांचे विचार कसे कळतात? यावर काही तज्ज्ञ दावा करतात की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काही हावभाव निर्माण होतात. ते हावभाव काही लोक वाचू शकतात. ज्या पद्धतीने अंध व्यक्ती ब्रेल लिपीच्या मदतीने वाचू शकतात. तसे लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू शकणारे लोक आहेत. हातवारे आणि शारीरिक प्रयत्नांव्यतिरिक्त, समोरच्या व्यक्तीचे वर्तन कसे आहे. यासोबतच त्याची बोलण्याची पद्धत काय आहे, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.

महाराज अनेक विधाने करतात

बागेश्वर सरकार अनेकदा हिंदूंना जागृत करण्याची भाषा करतात. मोठ्या मुद्द्यांवरही ते आपली विधाने करतात. बागेश्वर महाराज म्हणतात की, मी माझ्या कुटुंबासाठी काम करत नसून लोकांना जागृत करण्यासाठी करत आहे. धर्मांतराच्या विरोधात मी लोकांना जागृत करण्याचे काम करत आहे.

श्याम मानव यांचे आवाहन

आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा बागेश्वर बाबांनी केला आहे. बागेश्वर बाबांच्या या आव्हानाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि 30 लाख रुपये घेऊन जावे, असं आव्हानच श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना दिलं आहे. हे आव्हान दिल्यानंतर बागेश्वर बाबाही इरेला पेटले आहेत. त्यांनीही श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं आहे. मी चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या, असं आव्हानच बागेश्वर बाबांनी दिलं आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...