Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : नवीन संसद भवन कसे आहे, प्रथमच आला व्हिडिओ

New parliament building inauguration : नवीन संसद भवनाचे उद्घाटन रविवारी होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संसद भवनाची भव्यता दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी रिट्विट केलाय.

Video : नवीन संसद भवन कसे आहे, प्रथमच आला व्हिडिओ
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 1:04 PM

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन रविवारी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वात आधी विरोध केला. त्यांनी ट्विट करत हा विरोध केला. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. मग राहुल गांधी यांच्यासोबत देशातील १९ पक्ष आले. परंतु सरकारच्या समर्थनार्थ २५ पक्ष आले आहेत. या सर्व गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे आहे. हा व्हिडिओ या प्रतिष्ठित इमारतीची झलक दाखवत आहे. माझी एक खास विनंती आहे की, हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या आवाजाने (व्हॉईसओव्हर) शेअर करा, ज्यामुळे तुमचे विचार व्यक्त होतील. मी त्यापैकी काही रिट्विट करेन. “माय पार्लमेंट माय प्राईड हा हॅशटॅग वापरायला विसरू नका,”.

अनेकांनी केला रिट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेला व्हिडिओ अनेकांनी रिट्विट केला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यामुळे संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांची पंचाईत झाली आहे.

रविवारी होणार कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या समारंभास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवले नाही. यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदनही काढले आहे. परंतु आता सरकारच्या समर्थनार्थ 25 पक्ष आले आहेत.

हे ही वाचा

संसद भवनाचे उद्घाटन, विरोधकांपेक्षा समर्थनार्थ आले जास्त पक्ष, किती जणांनी दिला पाठिंबा वाचा

862 कोटी रुपयांचा खर्च झालेला नवीन संसद भवन तयार, कोण आहे आर्किटेक्ट बिमल पटेल

.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.