Mission Suryayaan : चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवस लागले, तर सूर्यापर्यंत जाण्यास किती वेळ लागणार ? काय आहे ISRO ची योजना

चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3 लाख 84 हजार 400 किमी इतके आहे. चंद्रयान-3 ला चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवसांचा प्रवास करावा लागला आहे. तर सुर्ययान किती दिवस घेणार ?

Mission Suryayaan : चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवस लागले, तर सूर्यापर्यंत जाण्यास किती वेळ लागणार ? काय आहे ISRO ची योजना
Aditya -L 1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 1:13 PM

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करुन नवा इतिहास रचल्याने अंतराळ क्षेत्रात भारताची वाहवा केली जात आहे. भारताने अत्यंक कमी खर्चात हे यश मिळविल्याने त्याचे कौतूक होणे योग्य आहे. आता चंद्रयान-3 मोहीमेच्या यशानंतर भारत सूर्यावर यान पाठविण्याची तयारी करीत आहे. सूर्यावर आदित्य एल-1 हे यान पाठविण्यात येणार आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी हे सूर्ययान पृथ्वीवरुन रवाना होणार आहे. चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवस लागले तर सूर्यावर जाण्यास किती दिवस लागतील याची चर्चा सुरु आहे. त्यावर इस्रोने स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3 लाख 84 हजार 400 किमी इतके आहे. चंद्रयान-3 ला चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवसांचा प्रवास करावा लागला आहे. तर सूर्याचं पृथ्वीपासूनचे अंतर 15 लाख किलोमीटर आहे. भारताचे आदित्य एल-1 हे सूर्ययान सूर्याजवळ जाण्यासाठी नेमका किती वेळ लागणार आहे. सूर्य हा तत्प तारा आहे. त्याचे तापमान प्रचंड मोठे आहे. इतक्या दूर असून आपल्याला या तापमानाच्या झळा सहन होत नाहीत. परंतू सूर्ययान सूर्याजवळ जाऊन त्याचा अभ्यास करणार आहे. काय म्हटले आहे इस्रोने पाहूयात..

आदित्य नाव का  दिले ?

भारताची महत्वाकांक्षी सूर्ययान मोहीमेत आदित्य एल-1 हे यान सूर्याजवळ 110 दिवसात पोहचणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. चंद्र मोहीमेचे नाव चंद्रयान असे तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ठेवले होते. आता सुर्यावरील मोहीमेचे नाव आदित्य एल-1 असे नाव दिले आहे. आदित्या सूर्याचे एक नाव आहे. इस्रोचे सूर्ययान सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस आणि गाभ्याचे 1, 60,000 अंश सेल्सिअस इतके आहे. पाहाता त्यावर उतरू शकत नाही. आदित्य एल-1 यान सुर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान हालो ऑर्बिटमध्ये लॅगरेंज पॉईंट – 1 येथून सुर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत हा अभ्यास होणार आहे. यासाठी त्यास एल-1 असा शब्द जोडला आहे.

आदित्य एल-1 मोहीमेचे उद्दीष्ट काय ?

इस्रोने म्हटले आहे की आदित्य एल- 1 मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तेथे होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी पाठविले जात आहे. सूर्यावरील घडामोडींचा पृथ्वी आणि इतर ग्रहांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर, सूर्याभोवतीच्या कोरोनावर नजर ठेवेल. तसेच आजूबाजूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कणांचा आणि चुंबकीय क्षेत्र अभ्यास करणार आहे.

Non Stop LIVE Update
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ.
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या.
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात.
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?.