भारतात एकूण किती रेल्वे स्थानके आहेत? तुम्हाला माहितीये याचे उत्तर
Indian Railway : भारतीय रेल्वेचं जाळे अनेक ठिकाणी पोहोचले आहे. रेल्वे हे भारतातील प्रमुख दळणवळणाचे साधन आहे. दररोज लाखो लोकं रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात वर्दळीची आणि व्यस्त असलेली रेल्वे आहे. पण भारतात एकूण किती रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
GK questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मालिकेचे उद्घाटन केले. यासाठी तब्बल 41,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी देण्या आला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 554 रेल्वे स्थानकांची पुर्नविकास करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे जी जगातील सर्वात व्यस्त आणि सर्वात जुनी रेल्वे म्हणून प्रसिद्ध आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, रेल्वेने आतापर्यंत 3.52 अब्ज प्रवाशांना सेवा दिली आणि 2023 मध्ये 1512 मेट्रिक टन मालवाहतूक केलीये. मुंबईत तर ती जीवनरेखा आहे. दररोज लाखो लोकं रेल्वेने प्रवास करतात. त्यासाठी दररोज 13,000 हून अधिक रेल्वे चालवल्या जातात. देशभरातील 7,325 स्थानकांनी रेल्वे जोडते.
भारतात एकूण किती रेल्वे स्थानके
भारतात एकूण 7325 रेल्वे स्थानके आहेत. अनेक रेल्वे स्थानके हे हायटेक आहेत. तर अनेक रेल्वे स्थानकांचा विकास होणे अजून बाकी आहे. सरकारने प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी पायाभूत सुविधा वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने मोठी तरतूद केली आहे. सरकारकडून 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद करून भारतातील वाहतूक मूलभूत पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय योजनेचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. शहरी विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेने रोडमॅप तयार केला आहे. या योजनेच्या अंतर्गत विविध श्रेणीतील प्रवाशांसाठी एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि लहान व्यवसाय बैठक क्षेत्र यासारख्या समर्पित जागांची तरतूद समाविष्ट आहे. यामुळे प्रवाशांना सुख-सुविधा देणे याला प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सुविधांसाठी तरतुदी केल्या आहेत, ज्यामध्ये पुरेशी शौचालये, दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा, एस्केलेटर, वेटिंग हॉलमध्ये चांगले फर्निचर आणि मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.