संसदेत 50 पैशांना मिळणारी थाळी आता किती रुपयांना मिळते?

संसदेच्या कॅन्टीनमध्ये आधी खूप स्वस्त जेवण मिळायचे. पण आता येथे चपाचीची किंमत किती आहे. शाकाहारी थाळी कितीला आहे. 50 च्या दशकात संसदेचे कॅन्टीन सुरू झाले, तेव्हा येथे शाकाहारी थाळीची किंमत किती होती? जाणून घ्या.

संसदेत 50 पैशांना मिळणारी थाळी आता किती रुपयांना मिळते?
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 10:15 PM

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. प्रत्येक सत्रात संसदेत गोंधळ पाहायला मिळतो. संसदेत दररोज येणाऱ्या खासदार, पत्रकार आणि प्रेक्षकांची संख्याही जास्त असते. पण तुम्हाला माहित आहे का की, संसदेत एक कॅन्टीन आहे? तिथे व्हेज थाळी कितीला मिळते आणि चपातीची किंमत किती आहे? हे खूप कमी लोकांना माहितीये आहे. आजही लोकं इथे स्वस्ताक जेवण मिळतं म्हणून टीका करतात. पण भारतीय संसदेचे कॅन्टीनही आज ७० वर्षांत पूर्णपणे बदलले आहे.

संसदेचे कॅन्टीन आता आधुनिक आणि सुसज्ज झाले आहे. बाजरीचे पदार्थ देखील येथील मेनूमध्ये मिळतात. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी संसदेच्या कॅन्टीनचे अनुदान रद्द करण्यात आले आहे. याआधी ते स्वस्त खाद्यपदार्थांमुळे चर्चेत होते. आता तिथे सर्व खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत.

संसद भवन संकुलातील कॅन्टीनचे व्यवस्थापन आधी उत्तर रेल्वेकडे होते. आता हे कॅन्टीन जानेवारी २०२१ पासून भारत पर्यटन विकास महामंडळ चालवत आहे. नवीनतम मेनूमध्ये कॅन्टीनमध्ये एका चपातीची किंमत ₹3 आहे. चिकन बिर्याणीची किंमत 100 रुपये तर चिकन करीची किंमत ₹75 आहे. शाकाहारी थाळीची किंमत देखील 100 रुपये आहे

संसदेच्या कॅन्टीनचा स्वतःचा एक इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संसदेचे कॅन्टीन अतिशय छोटे आणि पारंपारिक होते. गॅस शेगडीही नंतर आली. आधी येथे लोकसभेच्या कर्मचाऱ्यांनाच नियुक्त केले जात होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अनेकदा या कॅन्टीनमध्ये जेवायला यायचे असे ही सांगतात. पण नंतरच्या काळात कॅन्टीनची व्यवस्था बदलली.

1950 आणि 1960 या दरम्यान संसदेच्या कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले. त्यावेळी शाकाहारी थाळीची किंमत फक्त 50 पैसे होती, याशिवाय चहा, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थांचे दरही खूपच कमी होते. खासदार आणि कर्मचाऱ्यांना आणखी स्वस्त दरात जेवन मिळायचे.

संसदेचे अधिवेशन सुरू असताना कॅन्टीनमध्ये 5 हजार लोकांचे जेवन बनवले जाते. 11 वाजता येथे जेवण तयार होते. येथे १९ प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध होते. ज्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता याचा समावेश आहे. आता हे कॅन्टीन भारतीय पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच ITDC द्वारे 27 जानेवारीपासून चालवले जात आहे. आता खाद्यपदार्थांची संख्या 48 झाली आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.