तुम्हालाही लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करायचंय? जाणून घ्या नेमका किती खर्च येतो, कसं बुक करायचं

अनेकांना आपलं लग्न काहीशा हटके पद्धतीनं करण्याची इच्छा असते, त्यामुळे आता हेलिकॉप्टरचा नवीन ट्रेड सध्या मार्केटमध्ये आला आहे. अनेक कुटुंब लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करतात.

तुम्हालाही लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करायचंय? जाणून घ्या नेमका किती खर्च येतो, कसं बुक करायचं
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 8:00 PM

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आपलं लग्न इतरांच्या लग्नापेक्षा कसं वेगळ होईल, ते कायम सर्वांच्या लक्षात राहिलं पाहिजे यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी लग्नाचा स्पेशल इव्हेंट बनवला जातो. लग्नावर वारेमाप खर्च केला जातो. काही -काही लग्नावर तर एवढा खर्च होतो की त्या खर्चामुळे हे लग्न चर्चेमध्ये येतं.अनेकांना लग्न मांडवात हटके एण्ट्री घेण्याची इच्छा असते, त्यासाठी काही खास योजना देखील त्यांनी बनवलेल्या असतात.

आजकाल तर लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेणारे अनेक इव्हेंट संस्था देखील आहेत. त्यांचं पॅकेज हे लाखोंच्या घरात असंत. या संस्था तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या लग्नाचं नियोजन करतात. मात्र त्यानुसार त्यांच्या पॅकजची किंमत देखील बदलते. लग्नात मंगल कार्यालयापासून ते लग्नातील खाण्याच्या पदार्थांपर्यंत सर्व नियोजन या संस्थांकडून केले जाते.

दरम्यान अनेकांना आपलं लग्न काहीशा हटके पद्धतीनं करण्याची इच्छा असते, त्यामुळे आता हेलिकॉप्टरचा नवीन ट्रेड सध्या मार्केटमध्ये आला आहे. अनेक कुटुंब आपल्या मुलीला तिच्या सासरी पाठवण्यासाठी हेलिकॉप्टर बुक करतात. सहाजिकच तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल की हेलिकॉप्टर बुक करण्यासाठी किती खर्च येतो आणि ते कसं बुक करायचं याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला जर हेलिकॉप्टर बुक करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी दोन तासांसाठी दोन ते अडीच लाखांचा खर्च येतो. ज्या कंपन्या हेलिकॉप्टर भाड्यानं देतात त्यांचा असा नियम आहे की तुम्हाला दोन तासांपेक्षा कमी वेळेसाठी हेलिकॉप्टर बुक करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी दोन तासांसाठी हेलिकॉप्टर बुक करावं लागतं. त्यानंतर जर कंपनीपासून तुमच्या गावाचं अतंर जास्त असेल तर तिथे पोहोचण्यासाठी वेगळा चार्ज कंपनी तुमच्याकडून घेते. जर तुम्ही हेलिकॉप्टर दोन तासांसाठी बुक केलं आहे, आणि जर त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर तुमच्याकडून ताशी पन्नास ते साठ हजार रुपये दरानं पैसे आकारले जातात. त्यामुळे हेलिकॉप्टर बुकिंगचे फिक्स असे दर नाहीयेत. तुम्ही कोणत्याही ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बुकिंग साईटवर जाऊन हेलिकॉप्टरची बुकिंग करू शकता. तसेच तुम्ही ऑफलाईन देखील बुकिंग करू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.