अयोध्येच्या राम मंदिरासाठी आतापर्यंत किती पैसा लागला? आणखी किती पैसे लागणार ? पाहा विस्तृत माहीती

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात विधीवत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानंतर 23 जानेवारीपासून राम मंदिराचे दर्शन सर्वसामान्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यासाठी साल 2025 उजाडणार आहे. 5 फेब्रुवारी 2020 ते मार्च 31, 2023 या दरम्यान राम मंदिरासाठी 900 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अयोध्येच्या राम मंदिरासाठी आतापर्यंत किती पैसा लागला? आणखी किती पैसे लागणार ? पाहा विस्तृत माहीती
ram mandir budgetImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 6:26 PM

अयोध्या | 15 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. परंतू या मंदिराचे संपूर्ण बांधकाम साल 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत राम मंदिराच्या बांधकामासाठी 900 कोटी रुपये खर्च झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट सुरुवातीला राम मंदिर बांधण्याचा अंदाजित खर्च 1,800 कोटी रुपये येईल असे म्हटले होते. त्यात मंदिराची निर्मिती खर्च, साहित्य, मशिनरी, मजूरी आणि अन्य प्रशासकीय खर्चाचा समावेश आहे. परंतू ही आकडेवारी अंतिम नाही. एका अहवालानूसार राममंदिराच्या निर्मितीचा खर्च 3,200 कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकतो. श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते मंदिरासाठी रामभक्तांनी अपेक्षेहून अधिक पैसे दान केल्याचे म्हटले आहे. ज्यात सर्वाधिक दान प्रसिध्द राम कथा वाचक मोरारी बापू यांनी दिले आहे.

राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत जगभरातून 5,500 कोटी रुपयाचे दान मिळाले आहे. वास्तविक राम मंदिर ट्रस्टने जनतेतून 900 कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार एकट्या मोरारी बापू यांनीच 11.3 कोटी रुपयाचं दान केले आहे. रामचरितमानसचे प्रचारक असलेले गुजरातचे प्रसिद्ध रामकथा वाचक मोरारी बापू यांच्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन येथील अनुयायांनी एकत्रितरित्या 8 कोटी स्वतंत्रपणे दान केले आहेत.

राम मंदिराचं बजेट

श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रभारींनी आधी राम मंदिर तयार करण्यासाठी 1,800 रुपये खर्च येणार असल्याचा दावा केला होता. परंतू प्रत्यक्षात राम मंदिर बांधकामासाठी त्याहून जादा रक्कम खर्च होणार आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी तब्बल 3,200 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.