अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला किती मिळतो पगार?, आकडा ऐकून बसेल धक्का
रामनवमीच्या शुभ दिनानिमित्त संपूर्ण देशात रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येत रामलल्लाचा भव्य सुर्य तिलक समारंभाचे आयोजन केले आहे. याच वेळी राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्या दर महिना किती वेतन मिळते याबद्दल देखील भाविकांत उत्सुकता आहे.

शभरात आज रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येत आज भगवान श्री रामाचा सुर्य तिलक समारंभ मोठ्या श्रद्धेने पार पडला. अयोद्धेत श्रीराम जन्मभूमी मंदिराचे उद्धाटन २२ जानेवारी २०२४ रोजी झाले होते. या ऐतिहासिक क्षणी राम मंदिरात रामलल्लाची विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली होती. अलिकडे मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर मंदिराचे नवे मुख्य पुजारी म्हणून पंडित मोहित पांडेय यांची नियुक्ती झाली आहे. आता ते रामलल्लाची दैनंदिन पुजा आणि इतर धार्मिक अनुष्ठान करीत असतात.त्यांना या कामासाठी किती वेतन मिळते ते पाहूयात….
दर महिन्यास किती वेतन मिळते ?
मीडिया रिपोर्ट्स नुसार राम मंदिराचे मुख्य पुजारी पंडित मोहित पांडेय यांना महिन्याकाठी ३२ हजार ९०० रुपयांचे वेतन दिले जाते. तर इतर सहायक पुजाऱ्यांना ३१ हजार रुपये वेतन दिले जाते. याआधी यांना २५ हजार रुपये महिन्याला वेतन दिले जात होते. तर सहायक पुजाऱ्यांना २० हजार रुपये वेतन दिले जात होते.




अन्य सुविधा काय मिळतात?
मीडिया रिपोर्ट्स नुसार पंडित मोहित पांडेय यांना वेतनाशिवाय अन्य धार्मिक कार्यां संदर्भातील सुविधेसाठी निवासस्थान, प्रवासाचा खर्च, विशेष धार्मिक आयोजनात भाग घेण्याचा व्यवस्था ट्रस्टद्वारे केली जाते.
सामवेदमध्ये अभ्यास
अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी मोहित पांडेय यांना मंदिराचे मुख्य पुजारी पदासाठी आवश्यक वैदिक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यांनी सामवेदमध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून आचार्य ही डिग्री मिळवली आहे. मोहित पांडेय यांनी अनेक वर्षांपर्यंत दूधेश्वर वेद विद्यापीठात धर्म आणि अनुष्ठानांचे गहन अध्ययन केले आहे.