AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

27 रुपयांचे पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 83 रुपयांचे कसे होते?

2014 साली मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा पेट्रोल आणि डिझेलवर केवळ 9.48 आणि 3.56 रुपये इतका अबकारी कर आकारला जात होता |

27 रुपयांचे पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 83 रुपयांचे कसे होते?
Petrol Diesel Price Hike
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 11:35 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर सतत वाढत असल्याने आता सामान्य लोकांच्यादृष्टीनेही हा कळीचा विषय झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर इतक्या झपाट्याने का वाढत आहेत, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. कोरोनाच्या संकटाचा जागतिक अर्थकारणावर मोठा प्रभाव पडला होता. मात्र, आता कोरोना लशीसंदर्भात सकारात्मक वातावरण असल्याने आर्थिक विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. (Petrol and Diesel rates hike)

त्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर पाहायला मिळत आहे. परिणामी भारतात आगामी काळात पेट्रोल शंभरीपार जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्पादनानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत फार जास्त नसते. पण सरकारकडून लावण्यात येणाऱ्या विविध करांमुळे पेट्रोल आणि डिझेल सामान्यांपर्यंत पोहोचेपर्यंत महाग होते.

पेट्रोल आणि डिझेलवर कोणते कर लागतात?

पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये विविध करांची भर पडून त्याची किंमत वाढते. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर अबकारी कर (Excise Duty) आकारला जातो. यंदाच्या मे महिन्यात केंद्र सरकारने अबकारी करात वाढ केली होती. सध्याच्या घडीला एक लीटर पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 32.98 व 31.83 इतका अबकारी कर आकारला जातो.

2014 साली मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा पेट्रोल आणि डिझेलवर केवळ 9.48 आणि 3.56 रुपये इतका अबकारी कर आकारला जात होता. मात्र, मोदी सरकारच्या कार्यकाळात अबकारी या अबकारी करात 13 वेळा वाढ करण्यात आली. तर केवळ तीन वेळा अबकारी कर कमी करण्यात आला.

कच्च्या तेलापासून पेट्रोल-डिझेल कसे तयार होते?

भारत सरकार परदेशातून कच्च्या तेलाची आयात करते. त्यानंतर हे कच्चे तेल शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. त्यामधून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती करून ते पेट्रोलियम कंपन्यांकडे पाठवले जाते. पेट्रोलियम कंपन्या आपल्या नफ्याची रक्कम धरून हे इंधन पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवतात. त्यानंतर पेट्रोल पंप चालकांची कमिशन, केंद्र व राज्य सरकारचा कर यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढते. भारतात उत्पादन होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अबकारी कर (Excise duty) आकारला जातो. याच पैशातून सरकार कल्याणकारी प्रकल्प राबवते.

कच्च्या तेलाचे दर किती?

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर सतत वरखाली होत असतात. सध्या क्रुड ऑईलची प्रतिबॅरल किंमत 52 रुपये इतकी आहे. यापूर्वी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 67 रुपये इतके होते. मार्च महिन्यापर्यंत ते 40 रुपये प्रतिबॅरलपर्यंत खाली आले होते.

पेट्रोल सध्याचा दर कसा निश्चित होतो?

बेस प्राइस- 27.37 रुपये प्रति लीटर भाडे-0.37 रुपये प्रति लीटर एक्साइज ड्यूटी 32.98 रुपये प्रति लीटर डीलर कमीशन 3.65 रुपये प्रति लीटर व्हॅट 19 रुपये प्रति लीटर

(Petrol and Diesel rates hike)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे.
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद.
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई.