MP Crime: आधी मुलीसमोर आईला मारले, मग कीटकनाशक पिऊन स्वतः केली आत्महत्या, जाणून घ्या मध्य प्रदेशात नेमके काय घडले?

मध्य प्रदेशच्या बरवानी जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने आपल्या मुलीसमोरच पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर त्याने मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान मुलीने तेथून पळ काढला.

MP Crime: आधी मुलीसमोर आईला मारले, मग कीटकनाशक पिऊन स्वतः केली आत्महत्या, जाणून घ्या मध्य प्रदेशात नेमके काय घडले?
भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 8:04 PM

भोपाळ : कोरोना काळात रोजगार गेल्याने अनेक कुटुंबांमध्ये वादाच्या घटना वाढत आहेत. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात होणारी भांडणे काही ठिकाणी टोकाला पोहोचत आहेत. अशा वादांतून हत्येसारख्या गंभीर घटना घडत आहेत. मध्य प्रदेशात अशीच धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. त्यानंतर स्वतःचाही जीव संपवला. आरोपी पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपीने स्वतःच्या मुलींसमोरच पत्नीला संपवले आणि आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

आरोपीने मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला

मध्य प्रदेशच्या बरवानी जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने आपल्या मुलीसमोरच पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर त्याने मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान मुलीने तेथून पळ काढला. त्यामुळे तो मुलीला मारण्यात यशस्वी होऊ शकला नाही. नंतर त्याने स्वतः कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ वादातून दोन जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहाटेच्या सुमारास घडली घटना

ही घटना पार्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी सांगितले कि, पहाटे चारच्या सुमारास फोफा नावाच्या व्यक्तीने पत्नी बिस्नाबाईची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने त्याच्या मुलीवरही हल्ला केला, मात्र मुलगी लगेच तेथून पळून गेली. त्यानंतर त्या व्यक्तीने कीटकनाशक पिऊन जीव दिला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

मुलीच्या जबानीवरून गुन्हा दाखल

याप्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक आर.के.लववंशी यांनी सांगितले की, घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या टेपरी या आरोपीच्या मुलीच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. आरोपींनी पत्नीच्या हत्येचे आणि स्वतःच्या आत्महत्येचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर गावासह परिसरात घबराट पसरली आहे. या पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे, असे रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या आरोपीच्या मुलीची चौकशी करून घटनेमागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (Husband commits suicide by killing wife in Madhya Pradesh)

इतर बातम्या

sulli deal : “सुल्ली डिल” प्रकरणातील आरोपीची पोलिसांनाच धमकी, प्रकरण काय? वाचा सविस्तर

धक्कादायक! इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 61 वर्षीय नराधमावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.