पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील, तर एकमेकांना सोडलेलं बरं : सुप्रीम कोर्ट

एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवलं. 1995 मध्ये विवाहबद्ध झालेलं दाम्पत्य केवळ पाच दिवस सोबत राहिले होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट म्हणालं, जर पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी सेपरेट झालेलंच बरं. महत्त्वाचं म्हणजे नवरा बायकोचं वय हे 50 आणि 55 वर्ष आहे.

पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील, तर एकमेकांना सोडलेलं बरं : सुप्रीम कोर्ट
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 9:47 AM

नवी दिल्ली : जर नवरा-बायको (Married Couple) सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी एकमेकांना सोडलेलंच बरं, अशी टिपणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिली. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवलं. 1995 मध्ये विवाहबद्ध झालेलं दाम्पत्य केवळ पाच दिवस सोबत राहिले होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट म्हणालं, जर पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील तर त्यांनी सेपरेट झालेलंच बरं. महत्त्वाचं म्हणजे नवरा बायकोचं वय हे 50 आणि 55 वर्ष आहे.

पत्नीने हायकोर्टाने जारी केलेल्या घटस्फोटाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्ट म्हणालं, तुम्हाला व्यावहारिक व्हावं लागेल, आयुष्यभर केवळ कोर्टाची लढाई लढत राहणं योग्य नाही.

पोटगीचा निर्णय

हायकोर्टाने चुकीच्या पद्धतीने घटस्फोटाला मंजुरी दिली होती, असं महिलेने सुप्रीम कोर्टात सांगितलं. हायकोर्टाने परस्पर सहमतीकडे दुर्लक्ष केल्याचं महिलेने म्हटलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पोटगीबाबतचा निर्णय परस्पर संमतीने घेण्याच्या सूचना केल्या.

दुसरीकडे पतीनेही कोर्टासमोर आपली बाजू मांडली. “आम्ही केवळ 5-6 दिवसच एकत्र राहिलो, लग्न केलं तेव्हापासूनच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. हायकोर्टाचा निर्णय योग्य होता, मला पत्नीसोबत राहायचं नाही. मी तिला पोटगीही देण्यासाठी तयार आहे”, असं पतीने कोर्टाला सांगितलं.

घरजावई होण्याचा हट्ट

पतीच्या वकिलाने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार, त्यांचं लग्न 13 जुलै 1995 रोजी झालं. त्यानंतर पत्नीने पतीला आपल्यासोबत घरजावई बनण्याचा हट्ट धरला. आपण सधन कुटुंबातील आहोत, त्यामुळे माझ्या घरीच राहू असा आग्रह पत्नीने पतीकडे केला. महत्त्वाचं म्हणजे या महिलेचे वडील IAS अधिकारी होते. पतीने आपली मागणी मान्य न केल्याने ती त्याला सोडून माहेरी आली. तेव्हापासून दोघांमध्ये कोर्टात लढाई सुरु आहे. आता डिसेंबर महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या 

Aryan Khan | शाहरुखच्या पोराची कोठडी संपणार, पुढे काय काय घडणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.