Hyderabad Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबादमधील (Hyderabad) बोयागुडा भागात भंगाराच्या गोदामाला आग (Fire) लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या आगीत 11 जण जिवंत जळल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मूळ बिहारहून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
हैदराबाद : हैदराबादमधील (Hyderabad) बोयागुडा भागात भंगाराच्या गोदामाला आग (Fire) लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या आगीत 11 जण जिवंत जळल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मूळ बिहारहून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. 11 जणांचा या आगीमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. यावरून हे समजते की, आग किती जास्त भीषण होती. आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पहाटे 3 वाजता आग लागली होती. त्यानंतर पोलिस आणि अग्नी शामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदत कार्य करण्यास सुरूवात झाली.
गोदामाला आग लागल्यामुळे 11 कामगारांचा मृत्यू
माहितीनुसार घटनेच्या वेळी हे सर्व कामगार गोदामात झोपले होते. आग इतकी जास्त भीषण होती की, गोदामामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे देखील शक्य झाले नाही. विशेष म्हणजे या आगीमधून फक्त एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. गोदामात काम करणारे सर्व मजूर बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे.
इथे पाहा ANI केलेले Tweet
Telangana | 11 people died after a fire broke out in a scrap shop in Bhoiguda, Hyderabad
Out of 12 people, one person survived. DRF reached the spot to douse the fire. A shock circuit could be the reason for the fire. We are investigating the matter: Mohan Rao, Gandhi Nagar SHO pic.twitter.com/PMTIDa5ilg
— ANI (@ANI) March 23, 2022
पहाटे 3 वाजता गोदामाला लागली आग
पहाटे 3 वाजता गोदामाला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. गोदामामध्ये 12 मजूर झोपल्याची माहिती पोलिसांकडे होती. आग पहिल्या मजल्यावर लागली होती आणि मजूर दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. पोलिसांनी आणि अग्नी शामक दलाने मजूरांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, भिंत कोसळल्यामुळे मजूरांना वाचवता आले नसल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या :
Kolhapur : हत्येतला आरोपी गावात आला अन् राडा झाला, कागलमध्ये पोलीसांवरही दगडफेक, सोनाळीत झालं काय?
CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान