‘कोणत्याही स्वरुपाचे आरक्षण मला पसंत नाही, नोकरीत तर अजिबातच नाही’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वाचले नेहरुंचे पत्र
नरेंद्र मोदी यांनी संसदेत पुन्हा पंडीत जवाहरलाल नेहरुंचे पत्र वाचून दाखवित त्यांच्यावर आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पंडीत नेहरु भारतीय जनतेला आळशी म्हणायचे अशी टीका नुकतीच मोदी यांनी केली होती. आता पुन्हा नेहरुंवर त्यांनी नवा आरोप केला आहे.
नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी नेहरु यांचा उल्लेख आरक्षणासंदर्भात केला. एकदा नेहरुंनी त्यावेळी देशातील मुख्यमंत्र्यांनी चिट्टी लिहीली होती. त्याचे भाषांतर आपण मी वाचत आहे. मोदी नेहरुंच्या या इंग्रजी भाषेतील चिट्टीचे हिंदी भाषांतर करीत म्हणाले की,’ मी कोणत्याही स्वरुपाच्या आरक्षण पसंद करीत नाही. खास करुन नोकरीतील तर नाहीच नाही, मी अशा कोणत्याही पावलाविरुद्ध आहे. जे अकुशलतेला वाढीस आणून दु्य्यम दर्जाकडे घेऊन जाईल. ही पंडित नेहरु यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्र आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की म्हणून मी म्हणतो की हे जन्मजात आरक्षणाच्या विरोधी आहेत. नेहरु म्हणायचे की जर कोणा एससी, एसटी, ओबीसीला नोकरीत आरक्षण मिळाले तर सरकारच्या कामाचा दर्जा घसरेल. आज हे लोक आकडे मोजवतात ना, त्याचे मूळ याच्यात आहे. त्यावेळी या लोकांनी या थांबविले होते. जर त्यावेळी भरती झाली असते. आणि ते प्रमोशन होत-होत पुढे गेले असते, तर आज येथे पोहचले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 1961 रोजी नेहरु यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या या चिट्टीचा उल्लेख केला. या चिट्टीत नेहरुंनी मागास जातींना जाती आधारावर आरक्षणाची बाजू न घेता त्यांना चांगले शिक्षण देऊन सशक्त करण्यावर जोर दिला होता. गेल्या तीन दिवसांत मोदी यांनी दुसऱ्यांदा नेहरुंवर आणि कॉंग्रेसवर टीका केली आहे.
आंबेडकरांना भारतरत्न योग्य समजले नाही
कॉंग्रेसने ओबीसींना कधी ही पूर्ण आरक्षण दिले नाही, त्यामुळे त्यांना सामाजिक न्यायाची भाषा करु नये. जनरल कॅटगरीच्या गरीबांना आरक्षण दिले नाही. त्यांनी कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न योग्य समजले नाही. आता हे लोक सामाजिक न्यायाचे धडे देत आहेत. ज्यांच्या नेतृत्वाची गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्न विचारत आहेत असे नरेंद्र मोदी यांनी टीका करताना म्हटले.
लोकसभेतही नेहरुंवर केली होती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना पंडीत नेहरुंवर टीका केली होती. मोदी यांनी 1959 रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचा उल्लेख करीत देशाचे पहिले पंतप्रधान नेहरु यांनी देशाच्या जनतेला आळशी आणि कमी अकलेचे समजायचे अशी टीका केली. मोदी यांनी नेहरुंचे भाषण वाचून दाखवत म्हटले की नेहरु म्हणतात भारतातील लोकांना मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही एवढं काम करीत नाही जेवढे युरोप, जपान, चीन, रशिया वा अमेरिकावाले करतात. हे समजू नका त्या पिढी जादूने आनंदी झाल्या. त्या मेहनत आणि हुशारीने झाल्या आहेत. यावर मोदी म्हणाले की याचा अर्थ नेहरु भारतीयांना आळशी मानायचे आणि युरोपीयन लोकांच्या तुलनेत त्यांची बुद्धी कमी आहे.