मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो; प्रीतम मुंडेचं सडेतोड विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र, मोंदीच्या या कृतीवर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वेगळच म्हणणं आहे. (i like pm modi quality of not holding any press conference, says pritam munde )

मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो; प्रीतम मुंडेचं सडेतोड विधान
pritam munde
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 1:20 PM

बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र, मोंदीच्या या कृतीवर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वेगळच म्हणणं आहे. मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुणच आपल्याला आवडत असल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (i like pm modi quality of not holding any press conference, says pritam munde )

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी हे विधान केलं आहे. मोदींचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली. पण ते आपलं काम करत आहेत. आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत, असं मुंडे म्हणाल्या.

मोदींबद्दल चांगलं बोलणारे दहा लोकं असतील तर टीका करणारे चारदोन लोक असतातच. पण त्या टीकेने मोदी विचलीत होत नाहीत. ते आपलं काम करत राहतात, असंही त्या म्हणाल्या.

बीड राष्ट्रवादी मुक्त करू

यावेळी त्यांनी बीड राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. बीड जिल्ह्याला भ्रष्टाचारी राष्ट्रवादीपासून मुक्त करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी झटून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. सध्या कंत्राटदारांना हाताशी धरून आपणच काम केल्याचा आव आणला जात आहे. तशा बातम्याही पेरल्या जात आहेत. ज्या रस्त्याशी ज्यांचा संबंध नाही, त्या रस्त्याच्या कामाचं श्रेयही हे लोक घेत आहेत, असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना काढला.

एकाच मंचावर, पण एकमेकांशी बोलणं टाळलं

राज्याच्या राजकारणात मुंडे घराण्याला मोठे स्थान आहे. या घराण्यातील नेत्यांच्या एका इशाऱ्यावर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. धनंजय मुंडे आणि प्रीतम, पंकज मुंडे यांच्यातील राजकीय वैरसुद्धा महाराष्ट्रासाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. या बंधू-भगिनींमधील राजकीय चढाओढ आपण अनेकदा पाहिली आहे. त्यांच्या याच राजकीय वैराची झलक बीडमधील परळी येथील एका कार्यक्रमात पाहायला मिळाली. परळी शहरात 30 ऑगस्ट रोजी स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे, आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात मुंडे भाऊ-बहीण एकमेकांच्या बाजूला बसले होते. मात्र, शेजारी बसूनदेखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा किंवा संवाद झाला नाही. दोघांमध्ये संवाद न झाल्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरतोय. मात्र, या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर राजकीय शेरेबाजी मात्र मोठ्या ताकदीने केली. प्रीतम मुंडे यांना कार्यक्रमाला यायला उशीर झाल्याने त्यांनी परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवले. तर त्याला उत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी परळीचा पायाभूत विकास सुरु आहे, त्यामुळे ताईला इथे पोहोचण्यास उशीर झाला, अशी कोपरखळी मारली. याच राजकीय टोलेबाजीवर सध्या वेगवेगळी चर्चा होत आहे. (i like pm modi quality of not holding any press conference, says pritam munde )

संबंधित बातम्या:

‘माजी मंत्री म्हणू नका’ विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला, म्हणतात, ‘माझा हेतू तो नव्हता!’

सायेब… मी पण फोडू का नारळ?… जयंत पाटलांनी केली पूर्ण 6 वर्षीय लहानग्याची इच्छा

मनोहरमामा भोसलेच्या अडचणी वाढत्याच, बारामती कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी

(i like pm modi quality of not holding any press conference, says pritam munde)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.