मला माझी बायको परत दे.. आधी स्वत:च बायकोचं लग्न लावून दिलं, पण…
उत्तर प्रदेशमध्ये एका पतीने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याने खूप चर्चा झाली. मात्र या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. आता तोच पती त्याच्या पत्नीला परत घेण्यासाठी 3 दिवसांनी आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे ..

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका लग्नाची खूप चर्चा झाली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये दोन मुलांचा बाप असलेल्या पतीने, त्याच्या पत्नीचं तिच्याच प्रियकराशी लग्न लावून दिलं होतं. कारण त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र आता याप्रकरणात एक नवाच ट्विस्ट आला आहे, लग्नाच्या अवघ्या तीन दिवसानंतर तो इसम त्याच्या पत्नीला परत घेण्यासाठी नव्या (दुसऱ्या) पतीच्या घरी पोहोचला. धक्कादायक गोष्ट म्हणजे दुसऱ्या पतीनेही त्या महिलेला परत पाठवलं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या कहाणीत हे ट्विस्ट कसं आलं जाणून घेऊया.
बबलू असं त्या पहिल्या पतीचं नुाव आहे. 2017 साली बबलूचे गोरखपूर जिल्ह्यातील बेलघाट पोलीस स्टेशन हद्दीतील भुलनचक गावात राहणाऱ्या राधिकासोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. पण काही काळापूर्वी राधिकाचे त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या 21 वर्षीय विकाससोबत प्रेमसंबंध सुरू केले. पत्नीचे अनैतिक संबंध बबलूला समजल्यावर त्याला हे सर्व सहन झाले नाही. या जोडप्यामध्ये रोज भांडणे होऊ लागली.
बबलू राधिकाला अनेकदा मारहाण देखील करायचा. मात्र, 20 मार्च रोजी राधिका घरातून बेपत्ता झाली होती. विकासचे घर राधिकाच्या घरापासून 100 मीटर अंतरावर होते. ही बातमी पसरल्यावर विकासही बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर दोघेही एकत्र पळून गेल्याचे समोर आले. पत्नी आणि तिचा प्रियकर पळून गेल्याचे समजताच याबाबत बबलूने पोलिसांत तक्रार दाखल केली. चार दिवसांनी राधिका आणि विकास स्वतः परत आले. मात्र ते थेट पोलीस ठाण्यात गेले. बबलू आणि त्याचा भाऊ हीरा यांनाही तेथे बोलावण्यात आले.
रडत होती राधिका
जर राधिकाला विकाससोबत राहायचे असेल तर माझी हरकत नाही. या दोघांनी लग्न करावे, असे बबलूने पोलीस ठाण्यातच सांगितलं. एवढंच नव्हे तर त्याने स्वतःच त्याच्या पत्नीचं, तिच्या ECप्रियकराशी विकास याच्याशी लग्न लावून दिलं. राधिकाही ढसाढसा रडली. जे एकमेकांवर प्रेम करतात त्यांनी सोबत राहिलं पाहिजे, मी माझ्या बायकोला समजावण्याचा प्रय्तन केला, पण तिला विकास आवडत असेल तर तिने त्याच्यासोबतच रहावं, अशी भूमिका बबलूने मांडली.
रात्री पत्नीच्या सासरी पोहोचला आणि केली अजब मागणी
त्यानंतर विकास राधिकाला त्याच्या घरी घेऊन गेला. राधिकाचे तेथे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. मात्र लग्न होऊन तीनच दिवस झाले होते तेव्हा बबलू रात्री विकासच्या घरी पोहोचला. आणि म्हणाला – माझ्याकडून चूक झाली. मी मुलांना एकट्याला सांभाळू शकत नाही. लोकांचं बोलणं ऐकून मी राधिकाचं दुसरं लग्न लावून दिलं, पण मुलांना त्यांच्या आईची आठवण येते. राधिकाने आपल्यासोबत घरी यावं अशी मागणी बबलूने विकासकडे केली. तेव्हा विकासची आई म्हणाली की तुला राधिकाला सोबत न्यायचे असेल तर घेऊन जा. विकासनेही त्याच्या बायकोला घेऊन जाण्यासाठी होकार दिला.
नवा व्हिडीओ व्हायरल
याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बबलू म्हणाला की – आम्ही राधिकाचे जबरदस्तीने लग्न केले. 2 दिवसांनी आम्हाला समजलं की ती निर्दोष आहे. आता मी तिला परत घेऊन जातोय. यामुळे तिला आणखी काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी आमची राहील. आम्ही आमच्या कुटुंबासह प्रेमाने राहू, असं तो म्हणाला. गावातील हा लव्ह ट्रँगल सध्या बराच चर्चेत आहे.