अभ्यासपूर्ण टीकेला मी महत्त्व देतो, पण दुर्दैवाने सध्या चांगले टीकाकार सापडत नाही, पंतप्रधान मोदींकडून मुलाखतीत खंत
PM Modi Interview: खेळ खेळणारे बरेच लोक आहेत. पण, टीका करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. संशोधन करावं लागते
नवी दिल्ली: माझ्या आयुष्यात मी चांगल्या टीकांना खूप महत्त्व देतो, अशा टीकाकारांबद्दल मला आदर आहे, पण दुर्दैवाने टीकाकारांची संख्या कमी झाली आहे आणि फक्त आरोप करणाऱ्यांची जास्त. हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे. आपल्या राजकीय जीवनाची 20 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ओपन मॅगझिनला मुलाखत दिली, त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणे गप्पा मारल्या. ( i-miss-critics-attach-big-importance-to-criticism-says-pm-modi-in-an-interview )
मोदी म्हणाले की, खेळ खेळणारे बरेच लोक आहेत. पण, टीका करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. संशोधन करावं लागते, अशा वेगाने धावण्याच्या काळात, लोकांकडे त्या वेळेचा अभाव असतो, त्यामुळे मला जुन्या टीकाकारांची आठवण येते. शिवाय आपली उद्देश हा लोकांची मदत करणं हाच असतो असंही मोदी म्हणाले.
कोरोना काळात सरकारचं उत्तम काम
कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या सरकारचे कौतुक केलं. शिवाय देशातील प्रत्येक युवकाला ‘स्वावलंबी’ बनवण्याच्या सल्ला दिला. ते म्हणाले की, प्रत्येक युवकाला संधी मिळणं महत्वाचे आहे, ज्यामुळे ते कुणावरही अवलंबून राहू इच्छित नाही, पण त्यासाठी त्यांना उभं करणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड 19 हे मोठं एक जागतिक संकट आहे, भारताने कोविडला अधिक चांगल्या प्रकारे हाताळलं. भारताने आपल्या समन्वयाच्या जोरावर विकसित देशांपेक्षाही चांगलं काम केलं. लसीकरणात आपण घेतलेली भरारी हे स्वाबलंबित्वाचं प्रतीक आहे.
मित्रांनी सांगितलं म्हणून राजकारण आलो.
मित्रांच्या आग्रहावरून राजकारणात आल्याचं पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत सांगितलं. गांधीनगर ते नवी दिल्ली या प्रवासाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, माझा आणि राजकारणाचा दूरचाही संबंध नाही, केवळ मित्रांनी राजकारणात मला ढकललं. त्यांच्यामुळेच आज मी राजकारणात स्थिर झाल्याचं मोदींनी मान्य केलं.
ग्लॅमरपासून दूर राहणारे मोदी
पंतप्रधान म्हणाले की, मला नेहमीच इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. इतरांसाठी काम करणं नेहमीच माझ्यामध्ये परिपूर्णतेची भावना निर्माण करतं. मानसिकदृष्ट्या, मी स्वतःला शक्ती, चमक आणि ग्लॅमर च्या क्षेत्रांपासून दूर ठेवतो. त्यामुळे मी सामान्य नागरिकाप्रमाणे विचार करण्यास आणि चालण्यास कायम सक्षम राहतो.
समाजाची सेवा हीच ईश्वरसेवा
पीएम मोदी म्हणाले की, समाजसेवा ही ईश्वरची सेवा आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या गरीब कल्याण मेळव्याबद्दलही सांगितलं. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या जत्रेत भाग घेतला होता. ते म्हणाले की, त्यांचा कल लहानपणापासूनच आध्यात्मिक जीवनाकडे जास्त आहे. ‘जनसेवा ही प्रभुसेवा’ या तत्त्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली आणि त्यामुळेच माझं सरकार राष्ट्र उभारणीसाठी मदत करत असल्याचे ते म्हणाले.
मेहनत आणि घाम गाळून निर्माण केलेला विश्वास
मी नेहमीच लोकांच्या भेटून, त्यांच्या सहवासातून विश्वास निर्माण केला आहे. लोकांना वाटतं की, पंतप्रधान स्वत: आमच्याकडून आमच्या समस्या जाणून घेतात, आम्हाला विचारतात, आमच्यासारखे विचार करतात, त्यांना वाटतं की, मोदीही त्यांच्याच कुटुंबाचा भाग आहे. यातूनच माझा जनसंपर्क तयार झाल्याचं मोदी म्हणतात. हा विश्वास माझ्या पीआर एजन्सीने बनवलेला नसून मी मेहनत आणि घामाने मिळवला असल्याचंही मोदी म्हणाले.
बराच काळ सत्तेपासून दूर
पंतप्रधान म्हणाले की, मी बऱ्याच काळापासून सत्तेपासून दूर राहिलो आहे. मी लोकांच्या अडचणी पाहिल्या आहेत, त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या त्रासाची मला जाणीव आहे. त्यामुळेच माझे विचार, माझी धोरणं यात प्रत्येक सामान्य माणसाचा विचार असतो.
हेही वाचा:
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं नवं मिशन, आता देशातील शहरं कचरामुक्त करण्याचा संकल्प
Gandhi Jayanti 2021: राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ भन्नाट गोष्टी, ज्या तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील