केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची माहिती नव्हती; नितीन गडकरींची प्रांजळ कबुली

नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही प्रांजळ कबुली दिली आहे. (i was unaware pharma firms has started corona vaccine production, says nitin gadkari)

केंद्र सरकारच्या 'त्या' निर्णयाची माहिती नव्हती; नितीन गडकरींची प्रांजळ कबुली
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 2:14 PM

नवी दिल्ली: कोरोना लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी एका ऐवजी दहा कंपन्यांना लस निर्मितीचं लायसन्स दिलं पाहिजे, अशी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारला केली होती. मात्र सरकारने आधीच हा निर्णय घेतल्याचं समजल्यानंतर गडकरी यांनी सारवासारव केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दलची मला माहिती नव्हती, अशी प्रांजळ कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. (i was unaware pharma firms has started corona vaccine production, says nitin gadkari)

नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही प्रांजळ कबुली दिली आहे. 12 कंपन्या लसीचं उत्पादन करण्याचं काम करत आहे, हे मला माहीत नव्हतं. सरकारच्या या निर्णयाची मला माहिती नव्हती. पत्रकार परिषदेनंतर मला माहिती देण्यात आली, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

गडकरींचं नेमकं ट्विट काय?

“स्वदेशी जागरण मंचच्या पत्रकार परिषदेत मी काल भाग घेतला. त्यावेळी कोरोना लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी मी सल्ला दिला होता. एका ऐवजी दहा कंपन्यांना लस निर्मितीचे लायसन्स द्या, असा सल्ला मी दिला होता. मात्र, हा निर्णय खते आणि रसायन मंत्रालयाने आधीच घेतला असून त्यावर कामही सुरू झाल्याचं मला माहीत नव्हतं. पत्रकार परिषदेनंतर मला त्याबाबत सांगण्यात आलं. 12 कंपन्यांनी लसीचं उत्पादन सुरू केल्याची माहिती मला देण्यात आली. मला त्याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे मी सल्ला दिला होता. मात्र, केंद्र सरकारने आधीच योग्य पाऊल उचललं. त्याचा मला आनंदच आहे,” असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

काल काय म्हणाले होते गडकरी

गडकरी यांनी काल मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला होता. व्हॅक्सीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे व्हॅक्सीन बनविणाचं लायसन्स एका कंपनी ऐवजी दहा कंपन्यांना दिलं पाहिजे. आधी या कंपन्यांना भारतात व्हॅक्सीनचा पुरवठा करू द्या. त्यानंतर व्हॅक्सीन जास्त असतील तर त्या निर्यात करा, असं गडकरींनी सांगितलं होतं.

सेवा नको, रॉयल्टी द्या

प्रत्येक राज्यात दोन तीन लॅब आहेत. त्यांना व्हॅक्सिनची निर्मिती करण्याची परवानगी द्या. केवळ सेवा म्हणून व्हॅक्सिनची निर्मिती करून घेऊ नका. तर त्यांना दहा टक्के रॉयल्टी देऊन व्हॅक्सिन निर्मिती करायला सांगा. 15 ते 20 दिवसात हे सगळं करता येऊ शकतं, असंही ते म्हणाले होते. (i was unaware pharma firms has started corona vaccine production, says nitin gadkari)

संबंधित बातम्या:

एका ऐवजी दहा कंपन्याना कोरोना व्हॅक्सिन बनविण्याचं लायसन्स द्या; नितीन गडकरींचा सल्ला

Corona Vaccine : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला लसीकरणासाठी 9 महिने थांबावं लागणार? जाणून घ्या

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना कानमंत्र; काळाबाजार रोखण्याचेही आदेश

(i was unaware pharma firms has started corona vaccine production, says nitin gadkari)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.