रांची – आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS officer Pooja Singhal)आणि त्यांच्या नीकटवर्तींयांवर ईडीची( ED) कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. पूजाचे पती अभिषेक झा (Abhishek Jha)यांच्या रांचीच्या पल्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहचले. यासोबतच देशाच्या 11 ठिकाणी प्रकरणी तपास सुरु आहे. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी 25 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 16 तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत. ईडीच्या टीमने पूजा यांचे सासरे कामेश्वर झा यांच्या मुज्जफरपूर येथील घरी, तसेच दिल्लीत राहणारे भाऊ, आई–वडील आणि इतर सहकाऱ्यांच्या घरीही छापेमारी केली आहे.
ED raid at a location linked to IAS Pooja Singhal underway in Ranchi, Jharkhand. Several trunks were loaded in a bus amidst tight security by CRPF. pic.twitter.com/sNtawV81Z0
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 6, 2022
या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये छापे घातले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईत सगळी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. खुंटीत झालेल्या मनरेगा घोटाळ्यात ईडीने अधिकारी रामविनोद सिन्हा यांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून 4.25 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पैसे जात असल्याची कबुली त्यांनी चौकशीत दिली. त्यावेळी पूजा सिंघल या तिथे जिल्हाधिकारी होत्या. सुमारे 18 कोटींचा हा मनरेगा घोटाळा असून, त्या प्रकरणात आणि खाणींच्या लिलावात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येते आहे.
खाण सचिव पूजा सिंघल यांच्यावर शुक्रवारी झालेली ईडीची कारवाई अचानक झालेली नाही. याची पार्श्वभूमी आधीपासूनच तयार करण्यात आली. केंद्र सरकारने राजभवनाकडे राज्यातील भ्रष्ट पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी मागितली होती. एका महिन्यापूर्वी अशा चार अधिकाऱ्यांची नावे राज्य सरकारने राजभवनाला दिली होती. यात रांचीचे जिल्हाधिकारी छवी रंजन, के श्रीनिवासन, सुनील कुमार आणि मनोज कुमार यांच्या नावांचा समावेश होता. राजभवनाने या यादीत सात नावे जोडली होती. अशी 11 नावांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे देण्यात आली होती. राजभवनाकडून जी नावे देण्यात आली त्यात प्रामुख्याने पूजा सिंघल यांचे नाव होते.
राज्यात अजून काही अधिकाऱ्यांवर ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यात मुख्यमंत्री कार्यालयातील एक अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या एका नीकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्याप्रमाणे बाहेरच्या कोट्यातून आलेल्या एका प्रभावशाली व्यक्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.