महिला IAS अधिकाऱ्याचे सोशल मीडियावर होतंय कौतूक, २०२० मध्ये मिळाला होता सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

सोशल मीडियावर सध्या एका महिला जिल्हाधिकाऱ्याचे फोटो चर्चेत आहेत. या फोटोंवर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काय आहे कारण जाणून घ्या.

महिला IAS अधिकाऱ्याचे सोशल मीडियावर होतंय कौतूक, २०२० मध्ये मिळाला होता सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 11:29 PM

कानपूर : कानपूर देहाटमध्ये पोस्टींग असलेल्या सौम्या पांडे या आयएएस ऑफिसरचे ( IAS Officer ) अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे कानपूर देहाटच्या सीडीओ सौम्या पांडे चर्चेत आल्या आहेत. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. व्हायरल फोटोमध्ये त्या जमिनीवर बसलेल्या एका वृद्धाशी बोलताना दिसत आहे. एका आयएएस अधिकाऱ्याचे सर्वसामान्य आणि वृद्धांप्रती असलेले हे वागणे पाहून लोकं या महिला अधिकाऱ्याचं कौतुक करत आहेत.

कानपूर देहात सीडीओचे फोटो व्हायरल

IAS सौम्या पांडे कानपूर देहात CDO म्हणून तैनात आहेत. सौम्या पांडे या त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना त्यांना एक वृद्ध व्यक्ती जमिनीवर बसलेली दिसली. सौम्या यांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्या वृद्ध व्यक्तीसोबत बोलण्यासाठी थांबल्या. या दरम्यान त्यांचे हे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. जे सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सीडीओ कानपूर देहाटच्या ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग होते आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक सायकलची गरज होती, म्हणून ते मदतीसाठी आले होते.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

सौम्या पांडे जमिनीवर बसून तक्रार ऐकत आहे. या पदांवर बसून हुकूमशहा बनणारे इतर प्रशासकीय अधिकारीही असा धडा घेऊ शकतात का? माझी इच्छा आहे की प्रत्येक अधिकारी इतका साधा असावा पण हे केवळ कौटुंबिक मूल्यांमुळेच शक्य आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट लोकं करत आहेत.

सौम्या पांडे मुळच्या प्रयागराजच्या राहणाऱ्या आहेत. एक वर्ष UPSC परीक्षेची तयारी केल्यानंतर, पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी UPSC परीक्षेत चौथ्या क्रमांकासह त्या उतीर्ण झाल्या. मुलाच्या जन्मानंतर 23 दिवसांनी सौम्या पांडे त्यांच्या कामावर रुजू झाल्या. ज्याचे फोटो व्हायरल झाले. 2020 मधील त्यांची कामे पाहता त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारही मिळाला आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.