AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रात्रीच्या गडद अंधारातच…” घटस्फोटाच्या अर्जानंतर आयएएस टॉपर टिना दाबीची सूचक पोस्ट

IAS टॉपर टिना दाबी नुकतीच राजस्थान सरकारमध्ये वित्त (कर) विभागात सहसचिवपदी रुजू झाली.

रात्रीच्या गडद अंधारातच... घटस्फोटाच्या अर्जानंतर आयएएस टॉपर टिना दाबीची सूचक पोस्ट
Updated on: Nov 29, 2020 | 5:24 PM
Share

मुंबई : “रात्रीच्या गडद अंधारातच तारे अधिक प्रकाशमान होतात” अशी सूचक सोशल मीडिया पोस्ट आयएएस टॉपर टिना दाबीने (Tina Dabi) केली आहे. पती अतहर आमीर खानपासून (Athar Aamir Khan) घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टिनाने लिहिलेल्या या मेसेजकडे अधिक लक्षपूर्वक पाहिले जात आहे. (IAS topper Tina Dabi writes cryptic note days after filing for divorce with Athar Aamir Khan)

टिना दाबी नुकतीच राजस्थान सरकारमध्ये वित्त (कर) विभागात सहसचिवपदी रुजू झाली. दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली. त्यावेळी तिच्या फॉलोअर्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

उत्तराखंडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर टिना आणि अतहर या दोघांनाही समान पोस्टिंग्ज मिळत गेल्या. त्यांची प्रथम पोस्टिंग भिलवारा येथील एसडीएमच्या बरोबरीची होती. या वर्षाच्या सुरुवातीला टिनाला श्री गंगानगर जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त करण्यात आलं. तर अतहर जयपूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी रुजू झाला होता.

राजस्थान सरकारमध्ये नवी जबाबदारी मिळाल्यानंतर टिनाने इन्स्टाग्रामवर सूचक स्टोरी शेअर केली. “रात्रीच्या गडद अंधारातच तारे अधिक प्रकाशमान होतात” असं लिहिलेली इमेज तिने पोस्ट केली. त्याचा संदर्भ स्पष्ट नसला तरी याला अतहरसोबत घटस्फोटाच्या प्रकरणाची किनार मानली जाते.

उत्तराखंडच्या मसुरीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीतून प्रशिक्षण झाल्यानंतर टिना आणि अतहर यांनी 2018 मध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. टिना दाबी 2015 मध्ये UPSC ची टॉपर होती, तर त्याच वर्षी अतहर खान दुसऱ्या क्रमांकावर होता. IAS च्या प्रशिक्षणाच्या काळातच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

अथरशी लग्नगाठ बांधल्यानंतर लगेचच टीनाने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर स्वतःचे नाव टिना दाबी खान असे अभिमानाने अपडेट केले. इन्स्टा बायोमध्येही तिने स्वतःचे वर्णन “दिल्लीकर, काश्मिरी सून, आयएएस, या क्रमाने” असे केले होते. मात्र मार्च महिन्यात आपल्या नावापुढील खान काढल्यानंतर टिना-अथरच्या नात्यात सारं काही आलबेल नसल्याचा अंदाज चाहते बांधत होते. आता दोघांनीही खासगी आयुष्यातील मतभेदांनंतर जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. ते परस्पर संमतीने घटस्फोट घेणार आहेत.

संबंधित बातम्या :

नातं टिकवण्यात टॉपर अपयशी, IAS कपल टीना दाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

(IAS topper Tina Dabi writes cryptic note days after filing for divorce with Athar Aamir Khan)

आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले.
विनाअट शस्त्रसंधी स्वीकारण्याचं कारण काय? अरविंद सावंतांचा थेट सवाल
विनाअट शस्त्रसंधी स्वीकारण्याचं कारण काय? अरविंद सावंतांचा थेट सवाल.