बदली झाली आणि कलेक्टरनं बोऱ्या बिस्तर सगळा स्वत: गुंडाळला, का होतेय IAS ची देशभर चर्चा?

बिहारच्या नालंदा जिल्ह्याचे डीएम योगेंद्र सिंह यांची बदली समस्तीपुर येथे झाल्यानंतर त्यांनी ना फेअरवेल आयोजित करू दिला ना इतर कोणते कार्यक्रम त्यांनी आपले सामान स्वतःच घेतले आणि झाले रेल्वे स्टेशनकडे रवाना...

बदली झाली आणि कलेक्टरनं बोऱ्या बिस्तर सगळा स्वत: गुंडाळला, का होतेय IAS ची देशभर चर्चा?
बिहारचे आयएएस योगेंद्र सिंह
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 3:27 PM

योगेंद्र सिंह(IAS Yogendra Singh) बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार(Bihar CM Nitish Kumar) यांचा जिल्हा असलेल्या नालंदाचे जिल्हाधिकारी होते. एक डॅशिंग अधिकारी आणि विकासासाठी सदैव तत्पर असणारे अशी त्यांची ओळख होती. अलीकडेच बिहारमध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदल्या (Bihar IAS Transfer-Posting) करण्यात आल्या, त्यात योगेंद्र सिंह यांचे देखील नाव होते. मात्र बदली झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची फेअरवेल पार्टी न करता त्यांनी विनम्रपणे तेथून निरोप घेतला.

साधारणपणे अनेकदा आपल्याला असे चित्र पाहायला मिळते की, जेव्हा एखाद्या डीएमची बदली होते, तेव्हा त्यांच्यासाठी फेअरवेल पार्टीचे आयोजन केले जाते. त्यात त्यांना गिफ्ट दिले जातात, त्यानंतर कर्मचाऱ्यांची तुकडी त्यांना स्टेशन पर्यंत सोडायला जाते. मात्र योगेंद्र सिंह यांच्याबाबतीत असे काहीही पाहायला मिळाले नाही, त्यांनी स्वतः सामान घेत ते तेथून निघाले.

आईएएस योगेंद्र सिंह यांनी सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे राहून तिकीट घेतले आणि श्रमजीवी एक्सप्रेसने थेट पटना गाठले. त्यानंतर त्यांनी समस्तीपुरचे जिलाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या या साधेपणाची चर्चा राज्यभरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर चर्चा होत आहे, त्यांच्याबद्दल सविस्तर जावून घेवुया..

कोण आहेत आईएएस योगेंद्र सिंह?

योगेंद्र सिंह युपीच्या उन्नाव जिल्ह्याचे रहिवाशी असून ते 2012च्या बॅचचे आईएएस अधिकारी आहेत. नालंदाच्या आधी ते शेखपुराचे डीएम होते, तसेच ते पटना सिटीचे एसडीएम सुध्दा राहिले होते. जवळपास ३ वर्षांपासून ते नालंदाचे डीएम होते.

त्यांच्या या ३५ महिन्यांच्या कार्यकाळात आपल्या कामगिरीने त्यांनी लोकांची मनं जिंकली. खासकरून टूरिजम सेक्टरमध्ये त्यांनी नालंदाला विशेष मदत केली, तेथे सुरू झालेली जू सफारी हे त्यांच्याच प्रयत्नांचे यश होते. विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या हा अधिकारी ज्या साधेपणाने तेथून निरोप घेऊन गेला, अशा प्रकारचा निरोप त्यांनी इतर कोणत्याही कार्यकाळात पहिला नव्हता

योगेंद्र सिंह यांचा जन्म आणि शिक्षण –

त्यांचा जन्म 1990 साली उन्नाव जिल्ह्याच्या गंजमुरादाबाद ब्लॉकच्या छोटेसे गाव असलेल्या हरईपुर येथे झाला. तेथेच त्यांचे प्रार्थमिक शिक्षण झाले, त्यापुढील शिक्षण त्यांनी अटवा वैक स्थित असलेल्या विवेकानंद इंटर कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर मल्लावां येथील बीएन इंटर कॉलेजमधून 12 वी पूर्ण केली. लखनऊ युनिव्हर्सिटीमध्ये ग्रेजुएशन पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीमधून एमए पूर्ण केले.

डोक्यावरून हरवले बापाचे छत्र, मग आईच झाली बाप –

वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या वडील जय सिंह यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर योगेंद्र यांच्या पालन- पोषणाची, अभ्यासाची जबाबदारी श्यामा देवी यांच्यावर आली. शेतीवर उदरनिर्वाह करत त्यांनी हि जबाबदारी स्वीकारली आणि मुलाचे शिक्षण पूर्ण केले.

आपल्यावरील आर्थिक ओझं कमी करण्यासाठी लखनऊमध्ये ग्रेजुएशन करत असताना योगेंद्र मुलांचे क्लास घेत असत. बीएचा अभ्यास करत असताना त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. 2012 साली हि परीक्षा उत्तीर्ण करत देशात २८वा क्रमांक पटकावला. त्यातून त्यांची आयएएस म्हणून निवड होवून त्यांना बिहार कॅडर मिळाले.

कुटुंबात कोण कोण आहे?

पुरवावां जिल्ह्यातील हरदोई येथील नेहा यांच्यासोबत २०१८ साली त्यांचे लग्न झाले, ज्या गृहिणी आहेत. आई, पत्नी आणि मुलासोबत राहतात ज्याचे नाव नेयस आहे. आजही ते आपल्या गावाला जावून भेट देत असतात, गावातील तरुणांसाठी ते एक आदर्श आहेत, युवकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. त्यांच्या खरेपणाची आणि साधेपणाचे नेहमीच चर्चा होत असते.

 इतर बातम्या-

Latur Market : साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात, दर स्थिर असतानाही आवक वाढलेलीच

SA vs IND: अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकवताच गावस्करांचे शब्द बदलले, आता म्हणतात…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.