IC-814 Highjack : दोन लाल बॅग, एक काळी सूटकेस… काय होतं त्यात? या रहस्याच उत्तर कधी मिळेल का?
IC-814 Highjack : ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ या वेबसीरीजमुळे पुन्हा एकदा 25 वर्षापूर्वीची ही घटना चर्चेत आली आहे. यात एक काळी ब्रीफकेस आणि दोन लाल बॅगा आहेत. ब्रीफकेस आणि लाल बॅगमध्ये काय होतं? ते अजूनही रहस्यच आहे. काँग्रेसने त्या लाल बॅगेसंदर्भात काय दावा केलेला?
काही रहस्य ही कधीच समजत नाहीत. ती रहस्य बनूनच राहतात. 1999 साली इंडियन एअरलाइन्सचं IC-814 विमान हायजॅक झालं. या विमान अपहरणाशी संबंधित काही प्रश्नांची उत्तर अजूनही मिळालेली नाहीत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ या वेबसीरीजमुळे पुन्हा एकदा 25 वर्षापूर्वीची ही घटना चर्चेत आली आहे. भारताच्या इतिहासातील विमान अपहरणाची ही सर्वात मोठी घटना होती. या विमान अपहरणाशी संबंधित काही प्रश्नांची उत्तर अजूनही मिळालेली नाहीत. यात एक काळी ब्रीफकेस आणि दोन लाल बॅगा आहेत. ब्रीफकेस आणि लाल बॅगमध्ये काय होतं? ते अजूनही रहस्यच आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ या वेबसीरीजमध्ये विमान अपहरणाशी संबंधित वेगवेगळे पैलू दाखवण्यात आले आहेत. पण अजूनही काही सिक्रेट्स समजलेली नाहीत. अनुभव सिन्हा यांनी या वेबसीरीजच दिग्दर्शन केलं आहे.
वेबसीरीजमध्ये IC-814 विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक लाल बॅग ठेवताना दाखवण्यात आलय. यात स्फोटकं होती, असं म्हटलय. त्यात RDX किंवा ग्रेनेड होतं का? या बद्दल काही अधिकृत माहिती नाहीय. तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी ‘इन सर्विस ऑफ इमर्जेंट इंडिया- अ कॉल टू ऑनर’ या पुस्तकातून याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न केलाय.
ते रहस्य समजणार का?
दुसरी लाल बॅग त्यावेळी जसवंत सिंह यांच्याकडे होती. जेव्हा तीन दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी त्यांना कंदहारला घेऊन गेले होते. त्यावेळी त्या बॅगेतील सामान आजही रहस्यच आहे. काँग्रेसने त्या लाल बॅगेची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याशिवाय एक काळी ब्रीफकेस होती. कंदहारला परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत गेलेल्या अधिकाऱ्यांकडे ती बॅग होती. त्या दोन लाल बॅग आणि काळी बीफ्रकेस हे अजूनही रहस्यच आहे.
काँग्रेसने काय दावा केलेला?
2006 साली काँग्रेसने त्या लाल बॅगेत 200 मिलियन म्हणजे 20 कोटी डॉलर होते, हा पैसा दहशतवाद्यांना दिला असा दावा केलेला. जसवंत सिंह यांनी ‘इन सर्विस ऑफ इमर्जेंट इंडिया- अ कॉल टू ऑनर’ या पुस्तकातून हा दावा फेटाळून लावलेला.