या शहरातील मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटविल्या, काय आहे कारण ?
साईबाबांच्या पूजेवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्मियांना साईबाबांची मूर्ती मंदिरात ठेवू नये असे आवाहन अनेकदा करण्यात आले आहे. आता मंदिरातून या मूर्ती हटविण्याची मोहीम सुरु झाली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसीतील मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटविण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 14 मंदिरातून साई बाबांच्या मूर्ती हटविण्यात आल्या आहेत. येथील प्रसिद्ध बडा गणेश मंदिरातून देखील साईबाबांची मूर्ती हटविण्यात आली आहे. सनातन रक्षक सेना संघटनेचे अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य केले जाणार आहे. संघटनाचे म्हणणे आहे की आमचा साई पूजेला विरोध नाही. परंतू साईबाबांची मूर्ती लावणे योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
साईबाबांच्या मूर्तीवरुन हिंदू धर्मातील काही संघटनांनी विरोध केलेला आहे. हिंदू संघटनांच्या मते साई बाबा हे मुस्लीम आहेत. त्यांचा सनातन हिंदू धर्माशी काही संबंध नाही. यासाठी या मूर्ती मंदिरातून हटविण्यात येत असल्याचे दीपक यादव यांनी म्हटले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी देखील साईबाबांना विरोध केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात साईबाबांना चांद बाबा म्हणून संबोधण्यात यावे असा निकाल झाल्याचे दीपक यादव यांनी म्हटले आहे.
जेव्हा साईबाबांची मूर्ती लावली तेव्हाच विरोध करायला हवा होता, आज अखेर मूर्ती हटविण्यात आली आहे, याआधी श्रावण महिन्यात प्रवचनसाठी आलेल्या एका पंडीतजीने येथे साईबाबांची मूर्ती नको अशी मागणी केली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाला अशा कामात व्यग्र राहू नका असा सल्ला दिला होता. ज्यांना साईबाबांना पुजायचे असेल त्यांनी स्वतंत्र मंदिर बांधून पूजावे, त्यासाठी आमचा विरोध नसल्याचे या पंडीताने म्हटले होते. हिंदू धर्म सर्वांना मानतो, त्यामुळे लोक शिर्डीला देखील जात असतात. यात कोणतीही वाईट बाब नाही. ज्यांना जेथे जायचे ते जाऊ शकतात. कोणाच्या खाजगी जीवनात आपण दखल देऊ शकत नाही असे या पंडिताने म्हटले होते.
अजय शर्मा काय म्हणाले ?
आतापर्यंत 14 मंदिरातून साई बाबांची मूर्ती हटविण्यात आली आहे. नंतर अनेक मंदिरातून अशाच प्रकारे साईबाबांना हटविण्यात येणार आहे. बडा गणेश मंदिर परिसरात आनंदेश्वर महादेव च्या शेजारील साल 2013 मध्ये साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सनातन रक्षक दलाचे प्रदेश अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की ते देखील आधी साईबाबांच्या परिक्रमा फेरी करायचे परंतू गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी साई पूजा बंद केली असल्याचे सांगितले.