उरी : जम्मू-काश्मीरमधील उरी (Uri) जिल्ह्यात अतिरेकी कारवाया नेहमीच केल्या जातात. इंडियन आर्मीचे जवान दहशदवाद्यांना सडेतोड उत्तर देतात. श्रीनगर उरी मुझफ्फराबाद महामार्गाजवळ सोपोरच्या भागामध्ये IED बाॅम्ब अतिरेक्यांनी ठेवला होता. याचा स्फोट (Explosion) करून घातपात करण्याचा अतिरेक्यांचा इरादा सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. श्रीनगर उरी मुझफ्फराबाद महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. याच मार्गाच्या जवळ अतिरेक्यांनी (Terrorist) IED ठेवला होता. सुदैवाने याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली आणि मोठा अनर्थ टळला.
Controlled and safe detonation of an IED in Puthkhah area of Sopore near the Srinagar-Uri-Muzaffarabad highway. The IED was found early this morning by security forces. pic.twitter.com/jk1449UQum
हे सुद्धा वाचा— Mufti Islah (@islahmufti) June 11, 2022
सुरक्षा रक्षकांना या IED बॉम्बबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आयईडी नियंत्रित करत सुरक्षितरित्या स्फोट घडवून आणला. यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या दोन्हीबाजूंची वाहतूक काही वेळ थांबवून ठेवली आणि IED चा मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर मोठा आवाज झाला आणि सर्वत्र काळा धूर पसरला. यादरम्यान रस्त्यावरील लोकांना सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आले होते. आज पहाटे सुरक्षा दलांना आयईडी सापडला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने सुरक्षितपणे आयईडीचा ब्लास्ट केला.
काहींनी यादरम्यान IED ब्लास्ट डोळ्यांनी पाहिला. IED चा ब्लास्ट करण्यासाठी रस्त्यावरील लोकांना दूर थांबवण्यात आले होते. यादरम्यान अनेकांनी या ब्लास्टचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्येही सूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. मुफ्ती इस्लाह यांनी IED ब्लास्टचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला एका तासामध्ये जवळपास 700 लोकांनी बघितले.