भारत सोडला नाही तर कठोर शिक्षा आणि इतक्या दंडाची कु-हाड कोसळणार, पाकिस्तानींचे मोठे वांदे होणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

भारत जर सोडला नाही तर पाकिस्तानी नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. जर आधी दिलेल्या मुदतीप्रमाणे त्यांनी भारत सोडला नाही तर मोठा दंड त्यांच्याकडून वसुल केला जाणार आहे. जर पाकिस्तानी नागरिक तसेच लपून राहीले आणि त्यांना जर पकडले गेले ते थेट त्यांना अटक केली तर जाईलच शिवाय त्यांच्यावर खटला देखील गुदरला जाणार आहे.आतापर्यंत ५३१ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून मायदेश गाठला आहे. मात्र जर देश विहीत मुदतीत सोडला नाही तर अशा घुसखोराला भरसाठ दंड भरावा लागणार आहे.
पहलगाम येथे मंगळवारी ( २२ एप्रिल २०२५ ) रोजी सकाळी पर्यटकांवर थेट गोळीबार करीत त्यांची नृशंस हत्या केली. या हत्येचे व्हिडीओ समोर आल्यानंतर देशात संताप आहे. यानंतर भारताने स्ट्रेटजिक पावले उचलली आहेत.भारताने सिंधु पाणी वाटप करार केराच्या टोपलीत घातला आहे. तर सर्वप्रकारचे व्हिसा देणेही बंद केले आहे. आपल्या भारतात पाकिस्तानमधून अनेक नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येत असतात




या तारखेच्या आत पाक नागरिकानो देश सोडा
विशेषत: बायपास सारख्या महागडी हार्ट सर्जरी शस्रक्रिया करण्यासाठी अनेक पाकिस्तानी दरवर्षी भारतात येत असतात. पाकिस्तानींसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल आहे. तर या तारखेच्या आत पाक नागरिक मायदेशी रवाना झाले नाही तर त्यांना बेकायदा ठरवून त्यांच्या खटला दाखल होणार आहे. त्यात 3 वर्षांची कैद आणि तीन लाखांचा दंडाची कायद्यात तरतूद आहे.
गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश जारी केले आहेत.
दिलेल्या मुदतीपेक्षा जास्त काळ कोणताही पाकिस्तानी भारतात राहू नये याची खात्री करण्यास सांगितले आहे.. सार्क व्हिसा धारकांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते, तर वैद्यकीय व्हिसा धारकांना २९ एप्रिलपर्यंत वेळ वाढविण्यात आली आहे.
२४ एप्रिलपासून ५३१ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला असून हे नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. त्याच वेळी, ८४३ भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले. रविवारी २३७ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत आणि ११६ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात आले आहेत.
३ वर्षांचा तुरुंगवास आणि ३ लाख रुपये दंड
इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ नुसार, व्हिसाच्या निर्धारित वेळे पेक्षा जास्त काळ भारतात राहणे, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ३ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले.