विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!

कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण देशात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. विमानतळांवर तर अधिक खबरदारी घेतली जात आहे. (if one passenger sitting on plane found corona positive than every person sitting in that line will be quarantine)

विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 4:52 PM

नवी दिल्ली: कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण देशात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. विमानतळांवर तर अधिक खबरदारी घेतली जात आहे. नव्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विमानतळांसाठींची नियमावली आता अधिक कठोर करण्यात आली आहे. आता विमानातून प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला जरी कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यास विमानातील त्याच्या रांगेत बसलेल्या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना सर्व टेस्ट करूनच प्रवास करावा लागणार आहे. (if one passenger sitting on plane found corona positive than every person sitting in that line will be quarantine)

साधारणपणे RT-PCR चाचणीसाठी 30 सेकंद लागतात. तर त्याचा रिपोर्ट येण्याासाठी चार ते सहा तास लागतात. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने टेक्निकल स्टाफची संख्या वाढवली आहे. भारत सरकारने जारी केलेल्या नव्या गाईडलाइननुसार विमानातील एखाद्या रांगेतील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी तिष्ठत राहावे लागणार आहे.

अहवाल येईपर्यंत प्रवास नाही

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व प्रवाशांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहेत. जोपर्यंत त्यांच्या टेस्टचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना रोखून धरले जात आहे, असं या विमानतळावरील लॅबच्या प्रमुख डॉ. गौरी अग्रवाल यांनी ‘टीव्ही९ भारतवर्ष’शी बोलताना सांगितलं.

कालपासून ब्रिटनहून जेवढ्या फ्लाइट्स आल्या आहेत त्यातील पाच प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्ससाठी एनसीडीसी नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये कोरोनाचे नवे विषाणू आहेत की नाही? हे समजू शकणार आहे. जिनोम सिक्वेसिंगमध्ये थोडा वेळ जातो. त्यामुळे आता कोरोना झालेल्यांमध्ये स्ट्रेन आहे की नाही हे समजू शकेल, असं अग्रवाल म्हणाल्या. (if one passenger sitting on plane found corona positive than every person sitting in that line will be quarantine)

संबंधित बातम्या:

कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!

नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

(if one passenger sitting on plane found corona positive than every person sitting in that line will be quarantine)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.