जर भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झालं तर दोन्ही देशातील सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले आहे. अटारी बॉर्डरही बंद करण्यात आली आहे. भारतानं केलेल्या कारवाईनंतर आता पाकिस्तानच्या नेत्यांनी थयथयाट सुरू केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून ते लष्कर प्रमुखांपर्यंत युद्धाची भाषा बोलली जात आहे. अणू युद्धाची देखील धमकी दिली जात आहे.
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्याकडे अण्वस्त्र आहेत, शाहीन सारखे मिसाइल आहेत. आम्ही ते काही सजवण्यासाठी ठेवले नाहीत. आम्ही या अणू बॉम्बचा वापर भारताविरोधात करू असं, त्यांनी म्हटलं. चला तर जाणून घेऊयात जर समजा अणू युद्ध झालं तर दोन्ही देशांमधील कोणत्या भागाला त्याचा सर्वाधिक धोका आहे, आणि कोणते भाग सुरक्षित आहेत.
भारताच्या या शहरांना सर्वाधिक धोका
तज्ज्ञांच्या मते जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणू युद्ध झालं आणि जर पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्र हल्ला केला, तर भारत देखील प्रत्युत्तर देईल, भारत कमीत कमी पाकिस्तानचे 10 शहर उद्ध्वस्त करू शकतो. तर दुसरीकडे पाकिस्तानची नजर भारताच्या मुंबई, दिल्ली, बंगळूरू अशा शहरांवर असणार आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, तसेच सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेच शहर आहे. तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोणातून बंगळूरू हे शहर महत्त्वाचं आहे.
पाकिस्तानच्या कोणत्या शहरांना धोका?
जसे पाकिस्तानच्या निशाण्यावर भारतामधील शहरं असणार आहेत, त्याचप्रमाणे भारताच्या निशाण्यावर देखील पाकिस्तानची शहर असणार आहेत, इस्लामाबाद, लाहोर, कराची, पेशावर, मुल्तान, गुजरांवाला, रावळपिंडी, हैदराबाद आणि क्वेटा ही शहर भारताच्या निशाण्यावर असणार आहे.अणू बॉम्बेमुळे फक्त ही शहरच उद्धवस्त होणार नाहीत तर रेडिएशन, आणि अन्न-धान्य संकटासारख्या देखील मोठ्या समस्या निर्माण होतील. यासंदर्भात आपण हिरोशिमा आणि नागासाकीचं उदाहरण पाहू शकतो.