ही तीन मंदिरे आम्हाला दिली तर इतर मशिदीकडे ढुंकूनही पाहणार नाही – गोविंद देवगिरी महाराज
रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आम्हाला हे तीन मंदिर परत मिळाली तर आम्ही इतर ठिकाणी पाहणार देखील नाहीत. कोणते आहेत ते तीन मंदिरे जाणून घ्या.
पुणे : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी रविवारी एक मोठे वक्तव्य केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले की, अयोध्येनंतर काशी आणि मथुरा ही धार्मिक स्थळे शांततेत विलीन झाल्यानंतर आम्ही इतर सर्व मंदिरांशी संबंधित प्रश्न बाजूला ठेवू. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, मी आधीच सांगितले आहे की, तीन मंदिरे शांततेत विलीन झाल्यानंतर इतर मंदिरांकडे लक्ष देण्याची आमची इच्छाही नाही, कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भूतकाळात नाही. देशाचे भवितव्य चांगले व्हावे यासाठी ही तिन्ही मंदिरे (अधोया, काशी, मथुरा) समजूतदारपणाने आणि प्रेमाने दिली तर इतर सर्व गोष्टी आपण विसरून जाऊ.
प्रेमाने समजावून सांगू
एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मी त्या लोकांनाही प्रेमाने समजावून सांगतोय की, काही ठिकाणी समजूतदार लोक आहेत, तर काही ठिकाणी समजूतदार लोक नाहीत. जिथे परिस्थिती असेल तिथे त्याच पद्धतीने लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करु.
#WATCH | Pune, Maharashtra: Treasurer of Sri Ram Janambhoomi Trust Govind Dev Giri Maharaj says “We do not even desire to look at the other temples if three temples are freed because we have to live in the future and not in the past. The country’s future should be good and if we… pic.twitter.com/D4d4fQgViz
— ANI (@ANI) February 5, 2024
;
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच क्रमाने ते पुण्यातील आळंदीत पोहोचले होते. तिथे त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर हे देखील सहभागी झाले होते.
दोन्ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर 500 वर्षांनी राम मंदि तयार झाले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे मंदिराच्या गर्भगृहात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, परंतु सध्या मंदिराचे बांधकाम सुरू असून या डिसेंबरपर्यंत बांधकाम पूर्ण होईल. ज्ञानवापी आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.