वाचाल तर हादराल.. मुलगा दुसरा आला तर आईने पहिला आलेल्या टॉपरला टाकले मारुन, शाळेत गेली आणि..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी बाला जेव्हा घरी आला, तेव्हा त्याची प्रकृती बिघडली. त्याला सतत उलट्यांचा त्रास होत होता. त्यावर त्याच्या आईने त्याला शाळेत काही खाल्ले होते का, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने शाळेतील सुरक्षा रक्षकाने दिलेले ज्यूस प्यायले असल्याचे आईला सांगितले
पुड्डुचेरी – एका विद्यार्थ्याला परीक्षेत पहिला नंबर (topper in the class)आणणे, हे महागात पडले आहे. दुसरा क्रमांक आलेल्या मुलाच्या आईने (second number boy’s mother angry), मुलगा दुसऱ्या क्रमाकांवर आला याचा राग मनात ठेवत शाळेत जाऊन थेट या मुलाचा जीवच घेतला. विष (poison)देऊन या पहिल्या आलेल्या मुलाची हत्या करण्यात आली. या आरोपी आईला आता पोलिसांनी अटक केली आहे. हा मुलगा पहिला आल्याने मत्सरातून या बाईने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. आपला मुलगा स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर यावा, अशी इच्छा पालकांची असणे गैर नाही. मात्र ही इच्छा जेव्हा इर्षा होते, त्यावेळी काय घडते, याचे हे उदाहरण म्हणायला हवे. विद्यार्थ्यांपेक्षा पालकच या स्पर्धेत किती सहभागी असतात, हेही यानिमित्ताने समोर आले आहे. ही घटना पुड्डुचेरीत कराईकलमध्ये घडली आहे.
13 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा कट
मृत विद्यार्थ्याचे वय अवघे 13 वर्षांचे आहे, बाला मणिकंदन असे या मुलाचे नाव आहे. बाला आपल्या माता-पित्यासह कराईकल येथील नेहरु कॉलनीत राहत होता. त्याच्या वडिलांचे नाव राजेंद्र तर आईचे नाव मालती असे आहे. बालाने वर्गात नुकताच पहिला क्रमांक मिळवला होता. परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याची आई व्हिक्टोरिया यामुळे दु:खी झाली होती. त्यातून तिने बालाला मारण्याची योजना आखली
शाळेतून आल्यानंतर बालाची तब्येत बिघडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी बाला जेव्हा घरी आला, तेव्हा त्याची प्रकृती बिघडली. त्याला सतत उलट्यांचा त्रास होत होता. त्यावर त्याच्या आईने त्याला शाळेत काही खाल्ले होते का, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने शाळेतील सुरक्षा रक्षकाने दिलेले ज्यूस प्यायले असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीत महिलेची पटली ओळख
बालाच्या आई-वडिलांनी या सुरक्षारक्षकाची चौकशी केली. त्यावेळी बालाला ज्यूस का देण्यात आले अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी एका महिला त्याच्याकडे आली होती आणि तिने हे ज्यूस बालाला देण्यास सांगितल्याचे या सुरक्षारक्षकाने सांगितले. बाला याच्या घरातून हे ज्यूस देण्यात आले होते, असेही या महिलेने सांगितले. त्यानंतर सीसीटीव्हीत या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यात एक महिला सुरक्षारक्षकाला ज्यूस देत असल्याचे समोर आले आहे. या महिलेची ओळख बालाचा शाळेतील मित्राची आई व्हिक्टोरिया अशी पटली.
बालाचा मत्सर वाटत होता, आरोपी महिलेची कबुली
पोस्टमार्टेममध्ये हे समोर आले आहे की, या ज्यूसमध्ये विष मिसळण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी व्हिक्टोरिया हिला अटक केली आहे. तिच्या चौकशीत तिने त्या मुलाला विष टाकलेले ज्यूस दिल्याचे कबूल केले आहे. तिने सांगितले की बाला क्लासमध्ये पहिला येत असे. तर तिचा मुलगा दुसऱ्या क्रमांकावर असे. त्यामुळे तिला बालाचा मत्सर वाटत होता. त्यामुळे तिने हे कृत्य केले. त्यानंतर पोलिसांनी व्हिक्टोरियाला कोर्टात हजर केले असता, तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.