आरोग्याची काळजी घ्या… शेवटचे शब्द उद्गारताच आयआयटीचे प्राध्यापक स्टेजवर कोसळले; जागेवरच मृत्यू

आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंगचे वरिष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचं आकस्मिक निधन झालं आहे. समीर खांडेकर हे 53 वर्षाचे होते. खांडेकर यांच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि एक मुलगा आहे. खांडेकर यांचा जन्म जबलपूरला झाला होता. त्यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक केलं होतं. त्यानंतर पीएचडी करण्यासाठी ते जर्मनीला गेले होते.

आरोग्याची काळजी घ्या... शेवटचे शब्द उद्गारताच आयआयटीचे प्राध्यापक स्टेजवर कोसळले; जागेवरच मृत्यू
Professor Sameer KhandekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 2:48 PM

कानपूर | 24 डिसेंबर 2023 : आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंगचे वरिष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचं आकस्मिक निधन झालं आहे. समीर खांडेकर हे 53 वर्षाचे होते. माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना खांडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते स्टेजवरच खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. आरोग्याची काळजी घ्या, असे शेवटचे शब्द उद्गारताच खांडेकर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेमुळे सर्वच हादरून गेले आहेत.

आयआयटी कानपूरमध्ये माजी विद्यार्थ्यांचं स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राध्यापक समीर खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. भाषण करत असताना खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना काही मोलाचे सल्ले दिले. त्यानंतर आरोग्याची काळजी घ्या, असं त्यांनी म्हटलं आणि अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे खांडेकर खाली कोसळले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनीही त्यांना मृत घोषित केलं. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खांडेकर यांना पाच वर्षापासून उच्च कोलोस्ट्रोल आहे.

छातीत कळ आली अन् घाम फुटला

आयआयटी कानपूरचे माजी संचालक अभय करंदीकर यांनीही प्रा. खांडेकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. खांडेकर हे उत्तम शिक्षक आणि संशोधक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचं वृत्त ऐकून आम्हालाही धक्का बसला. खांडेकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून मीही सून्न झालो आहे. खांडेकर व्याख्यान देत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना घाम फुटला. त्यामुळे ते स्टेजवर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली, असं प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितलं.

मुलगा आल्यावर अंत्यसंस्कार

करंदीकर यांचा मृतदेह आयआयटीच्या आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे. खांडेकर यांचा एकूलता एक मुलगा प्रवाह खांडेकर आल्यावरच प्रा. खांडेकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. प्रवाह खांडेकर हे लंडनच्या केंब्रिज विद्यापीठात शिकत आहेत. खांडेकर यांच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि एक मुलगा आहे. खांडेकर यांचा जन्म जबलपूरला झाला होता. त्यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक केलं होतं. त्यानंतर पीएचडी करण्यासाठी ते जर्मनीला गेले होते.

पोस्टमार्टेम नंतर कारण कळेल

खांडेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचं पोस्टमार्टेम केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण करणार आहे. त्यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्ट की कार्डियाक ब्लॉकमुळे झाला हे पोस्टमार्टेम नंतर कळेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.